स्वप्निल जोशी : नाशिकसार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीसाठी ४३ उमेदवार रिंगणात असून, ज्या वाचनालयाची निवडणूक आहे जिथे वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळी आश्वासने देण्यात येतात आणि जागर केला जातो आणि निवडणुकीनंतर हे उमेदवार जी जबाबदारी घेऊ पाहणार आहे त्यापैकी २२ उमेदवारांनी सार्वजनिक वाचनालयात पुस्तकाची देवाण घेवाण करण्यासाठी वाचनालयाचा उंबरा झिजवला नसल्याचे वाचनालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीतून समोर आले आहे. काही उमेदवारांची दोन वर्षाची तर काही उमेदवारांच्या वर्षभरातील नोंदींचा यात समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक रविवारी (दि. २) होणार असून, यासाठी ग्रंथमित्र पॅनल, जनस्थान पॅनल, परिवर्तन पॅनल यासह अपक्ष उमेदवार सावानाच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाचनालयाचे स्मार्ट कार्ड काढल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे, तर काही उमेदवारांच्या नातेवाइकांकडूनच वाचनालयाचा सर्रास वापर केला जात आहे. अनेक उमेदवारांच्या घरी समृद्ध ग्रंथसंपदा असल्याचेही यानिमित्ताने पुढे आले आहे. विविध पॅनलकडून वाचनालयातील विविध विभागांचे आधुनिकीकरण करणे, सावानाच्या संकेतस्थळावर वाचनालयातील पुस्तकांबाबत माहिती प्रकाशित करणे, सभासदांपर्यंत वाचनालयाने पोहोचणे, ई-वाचन पद्धती उपलब्ध करणे, पेटी पुस्तक योजना सुरू करणे आदि घोषणा करण्यात आल्या असल्या तरी याच घोषणा करणाऱ्या उमेदवारांनी वाचनालयात येऊन पुस्तकांची देवाण घेवाणच केली नसेल तर ते आपल्या वचननाम्यातील किती गोष्टींची पूतर्ता करतील याबाबत कल्पना न केलेलीच बरी. निवडणुकीआधी विविध मुद्द्यांनी सावाना चर्चेत आलेले असताना निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरसुद्धा चर्चेत आहे. उमेदवारांनी आपल्यालाच मतदान करावे यासाठी अनेक क्लृप्त्या लढविण्यात आल्या. वैयक्तिक गाठीभेटींबरोबरच मेसेजेस, व्हॉट्स अॅप, सोशल माध्यमांतून होणारा प्रचार कमी की काय म्हणून स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींप्रमाणेच सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत जेवणावळीदेखील उठल्या. निवडणूक काळात प्रत्येक उमेदवारानी वेगवेगळी आश्वासने देऊन विजयाचा दावा केला असला तरी ज्या उमेदवारांनी कित्येक वर्षांपासून पुस्तकेच वाचली नसतील त्यांना निवडून द्यावे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.कोणी किती पुस्तके वाचली ?उमेदवार पुस्तक संख्यामकरंद सुखात्मे२२०मंदार क्षेमकल्याणी५४संजय येवलेकर४५सुनेत्रा महाजन२२हेमंत राऊत२१भालचंद्र वाघ१५सतीश महाजन१३नंदन रहाणे११शरदचंद्र दाते११रमेश जुन्नरे८विलास औरंगाबादकर७सुरेश गायधनी७अमित शिंगणे६
वाचनाची गती मंद; निवडणुकीची मात्र धुंद
By admin | Updated: April 1, 2017 01:14 IST