शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘हम सब एक है’ चा नारा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 01:07 IST

केंद्र शासनाने केलेल्या राष्टÑीय नागरिकता नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी डाव्या संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीत सहभागी हजारो नागरिकांनी ‘हम सब एक है’ असा नारा दिला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संविधानविरोधी असल्याचा आरोप करीत सदर कायदा रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देनागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा : भारतीय संविधान बचावची घोषणाबाजी

नाशिक : केंद्र शासनाने केलेल्या राष्टÑीय नागरिकता नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी डाव्या संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीत सहभागी हजारो नागरिकांनी ‘हम सब एक है’ असा नारा दिला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संविधानविरोधी असल्याचा आरोप करीत सदर कायदा रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.केंद्र शासनाने राष्टÑीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) व नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएबी) मंजूर केल्याच्या निषेधार्थ शहरात डाव्या पक्षांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस मुस्लीम समाजाच्या विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवित रॅलीत सहभाग घेतला. गोल्फ क्लब मैदान येथून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. त्र्यंबकरोड सिग्नलमार्गे, जिल्हा परिषद, जीपीओरोड, गंजमाळ सिग्नलमार्गे रॅली शिवाजीरोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत आली. रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या तीव्र विरोधात घोषणाबाजी करीत ‘भारत माता की जय’ तसेच ‘देश बचावा’च्या घोषणा दिल्या. ‘हिंद-मुस्लीम एक आहे’, देश तोडण्याचा कायदा रद्द करा, भारत मेरा देश है, भारत के सन्मान मे हम उतरे मैदान में, असे फलक रॅलीत झळकविण्यात आले.विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभागमोर्चा रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीचा लक्षणीय सहभाग होता. एनआरसी, सीएबी, नको तर नोकऱ्या द्या, देशात फूट पाडू नका, भेदाभेदपासून हवी आझादी, अशा घोषणा देत तरुणांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थिनींनीदेखील राष्ट्रीय एकात्मता आणि भारतमातेच्या घोषणा देत देशात फूट पाडणारा कायदा रद्द करण्याच्या तीव्र घोषणा दिल्या. यावेळी तरुणांनी तिरंगा ध्वज फडकावित राष्ट्रीय एकात्मता, तसेच भारतीय संविधान वाचविण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरत घोषणा दिल्या. महाविद्यालयीन तरुण-तरुणींसह महिला वर्गाचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन