शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांच्या तुलनेत अल्पशी वाढ आजपासून लाॅकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 01:41 IST

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी मंगळवारी (दि.११) सोमवारच्या तुलनेत रूग्ण संख्येत अल्पशी वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्ह्यात बुधवार (दि. १२) पासून लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नाशिक : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी मंगळवारी (दि.११) सोमवारच्या तुलनेत रूग्ण संख्येत अल्पशी वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोनाला अटकाव करण्यासाठी जिल्ह्यात बुधवार (दि. १२) पासून लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.सोमवारी (दि.१०) १८३५ नवे बाधित होते, मात्र मंगळवारी २ हजार १८७ नवे बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील बाधितांच्या संख्येने कहर केला होता. मात्र एका उच्चांकी संख्येपर्यंत गेलेली बाधितांची संख्या मे महिन्यापासून कमी होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसात बाधितांची संख्या कमी अधिक होत असली तरी एकंदर बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे. ८ मे रोजी २,७९५ बाधित आढळले होते. त्यानंतर रविवारी (दि.९) ३ हजार २ रूग्ण तर सोमवारी (दि.१०) १ हजार ८३५ इतकी कमी संख्या होती. शहरातील संख्या ९७३ इतकी कमी होती. गेल्या काही दिवसात चार आकडी संख्येपेक्षा नाशिक शहरातील बाधितांची संख्या कमी होत नव्हती. मात्र सोमवारी हजाराच्या खाली ही संख्या गेल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र मंगळवारी जिल्ह्याच्या आणि शहराच्या बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी २ हजार १८७ नवे बाधित आढळले आहेत. त्यात नाशिक शहरातील १ हजार ५८४ बाधितांचा समावेश आहे. बाधितांची संख्या गेल्या चार दिवसात कमी जास्त होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत  आहे. मंगळवारी तब्बल पाच हजाराहून अधिक बाधितांनी कोराेनावर मात केली. शनिवारी (दि.८) ४ हजार ६९, रविवारी (दि. ९) ३ हजार २५ बाधितांची संख्या गेल्या चार दिवसात कमी जास्त होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत  आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक