सिन्नर : तालुक्यातील भोजापूर येथील धरणात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोनेवाडी येथील अण्णासाहेब राजाराम सहाणे (४७) यांचा मृतदेह भोजापूर धरणात तरंगत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्याम मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर दोडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. (वार्ताहर)
भोजापूर धरणात बुडून इसमाचा मृत्यू
By admin | Updated: March 22, 2016 23:07 IST