पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून मध्यरात्रीच्या सुमारास ती घरात झोपलेली असताना संशयित राजू सीताराम आहिरे (४१) याने बळजबरीने घरात प्रवेश केला आणि तिच्या शेजारी येऊन झोपण्याचे सोंग घेत पीडितेसोबत अंगलट करीत अश्लील चाळे सुरू केले. या वेळी पीडितेने त्यास विरोध करीत बाजूला ढकलून दिले असता, संशयिताने पुन्हा तिच्याजवळ जात तिचे हात दाबून धरत तिला शिवीगाळ करून “आरडाओरड केलीस तर बघ, जीवे मारून टाकीन,” असा दम देत तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना ९ तारखेला मध्यरात्री घडली. पोलिसांनी संशयित राजूविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) व बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस नाईक लिलके पुढील तपास करीत आहेत.
------------