शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीत झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:14 IST

अंबड एमआयडीसीतील सिमेन्स कंपनी गेट नंबर एक समोरील पार्किंगच्या जागेत सामाजिक उपक्रमातून लावलेली झाडे रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून कापण्यात आली असून, यासंबंधी येथील व्यावसायिकांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

नाशिक : अंबड एमआयडीसीतील सिमेन्स कंपनी गेट नंबर एक समोरील पार्किंगच्या जागेत सामाजिक उपक्रमातून लावलेली झाडे रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून कापण्यात आली असून, यासंबंधी येथील व्यावसायिकांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.या संदर्भात व्यावसायिकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अंबड एमआयडीसी परिसरातील सिमेन्स कंपनीच्या गेट क्रमांक एकच्या समोरील जागेत अनेक छोटे व्यावसायिक गाळे आहे. या गाळेधारकांना पार्किंगसाठी गेल्या चार वर्षांपूर्वी एमआयडीसीकडून जागा देण्यात आली होती. याठिकाणी येथील व्यावसायिकांनी रस्त्याला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेत सामाजिक उपक्रमांतून वृक्षांची लागवड केली होती; मात्र येथील भूखंड मिळविण्यासाठी अज्ञान इसमांकडून येथील सुमारे १५ ते २० फूट उंचीची झाडे रात्रीच्या सुमारास कापून टाकण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत संबंधित गाळेधारकांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच कार्यकारी अभियंता एमआयडीसी सातपूर यांना भेटून याबाबत तक्रार केली असून, वृक्षतोड करणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर जागा ही मोकळी दाखवून ही मोकळी जागा मिळविण्याचा संशय व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात संबंधित व्यावसायिकांनी नाशिक महानगरपालिका उद्यान विभाग, निमा विभागीय कार्यालय, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक, वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक, उपअभियंता एमआयडीसी नाशिक, मुख्यमंत्री कार्यालय, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय, नाशिक यांच्याकडे लेखी तक्रार नोंदिविली असून, कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीforestजंगल