शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

कत्तलखाने अजूनही सुरूच

By admin | Updated: April 13, 2016 00:23 IST

तिघांना कोठडी :२२ जनावरे जप्त

इंदिरानगर : वडाळागावातील साठेनगरमधील अवैध कत्तलखाना इंदिरानगर पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यानंतरही याठिकाणी आणखी दोन कत्तलखाने सुरू असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान पोलिसांनी या ठिकाणाहून पुन्हा तिघा संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून कत्तलीसाठी आणण्यात आलेली २२ जनावरे जप्त केली आहे़ या तिघा संशयितांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ साठेनगरमधील पत्र्याच्या शेडच्या गुदामामध्ये जनावरांची अवैधपणे कत्तल केली जात असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षातून इंदिरानगर पोलीस ठाण्यास कळविण्यात आली होती़ त्यानुसार पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी छापा टाकला असता या ठिकाणी अवैध कत्तलखाना सुरू असल्याचे समोर आले़ या ठिकाणाहून दोन संशयितांना अटकही करण्यात आली आहे़ इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी हे मंगळवारी (दि़ १२) सकाळी सहा वाजेच्या सुमारास साठेनगरमध्ये गस्त घालत असताना त्यांना ६ गायी व १५ बैल संशयास्पदरीत्या बांधून ठेवल्याचे आढळून आले़ त्यानुसार त्यांनी संशयित नजाउद्दीन शेख (२८), मुश्ताक शेख (२०) व सजाद शेख (२६, तिघेही राहणार संगमनेर) यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ या सर्वांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी कत्तलीसाठी ही जनावरे आणल्याची कबुली दिली़ या तिघांवरही महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़ दरम्यान, या संशयितांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ इंदिरानगरसह परिसरात अवैध कत्तलखाने कार्यरत असून याठिकाणी कत्तल करण्यासाठी जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यात नाशिक पोलिसांनी मोठ्याप्रमाणात जनावरांचे मांस वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई केली आहे. यामुळे परिसरात कत्तलखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी जनावरे आणली जात असावीत असा संशय व्यक्त होत आहे. (वार्ताहर)