शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

साल्हेर राखीव वनक्षेत्रातील चंदनाच्या आठ झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 15:02 IST

सटाणा : बागलाणमध्ये साग तस्करांच्या टोळीने आता डोकेवर काढले असुन यंत्रणेच्या कृपाशीर्वादाने राजरोस साग तस्करी सुरु असतांना  वन विभागाच्या साल्हेर येथील निसर्ग परिचय केंद्रालगत असलेले पंचवीस ते तीस वर्षांची चंदनाची आठ झाडे कापून नेल्याने खळबळ उडाली आहे .चोवीस तास पाहरेकरी असलेल्या केंद्राजवळून दहा ते बारा लाख रु पयांची चंदनाची झाडे चोरून नेल्याने वन विभागाचे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत .

बागलाण तालुक्यातील वन संपदा आणि वनक्षेत्रात चालणारी शासकीय कामे ठेकदार,तस्कर व वन यंत्रणा या त्रिकुटासाठी सध्या कुरण असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी प्रसिद्ध डाबखलच्या जंगलात मोठ्या प्रमाणात सागाची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर वन विभाग खडबडून जागा होऊन पाच तस्करांना बेड्या ठोकल्या होत्या. ही घटना ताजी असतांनाच वन विभागाच्या साल्हेर येथील निसर्ग परिचय केंद्रालगत गेल्या पंचवीस ते तीस वर्षांची चंदनाचे डेरेदार वृक्ष तस्करांनी कत्तल करून चोरून नेले. या वृक्षांची अंदाजे किंमत बाजारात दहा ते बारा लाख रु पये आहे. ही तक्सरी होऊन आज आठ ते दहा दिवस होऊनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल न केल्याने वन विभागाची यंत्रणा संशयाच्या भोव-यात सापडली आहे. वास्तविक घटना घडल्यानंतर तत्काळ पंचनामा करून चोरट्यांंविरु द्ध गुन्हा दाखल करणे आवश्यक होते .परंतु झाडे चोरी होऊन आठ ते दहा दिवस उलटून कोणतीही कारवाई न झाल्याने तस्कर आणि वन यंत्रणा यांची अभद्र युती याच्या पाठीमागे काम करत असल्याचे बोलले जात आहे. पूर्ण वाढ झालेल्या चंदनाच्या झाडाची किंमत सुमारे एक ते दीड कोटीच्या घरात आहे. गेल्या काही वर्षापासून आयुर्वेदाकडे सर्वांचा कल वाढत आहे. गुणकारी आणि साईड इफेक्ट नसल्यामुळे आयुर्वेदाला पसंती मिळत आहे. ही बाब विचारात घेऊन औषधे तयार करण्यासाठी अन्य वनौषधींबरोबरच चंदनालाही आयुर्वेदिक कंपन्यांकडून प्रचंड मागणी असल्याचे सेवानिवृत्त वनाधिकारी बी.एस.जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी