शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

महापुरुषांची बदनामी; शहरात रास्ता रोकोचा प्रयत्न

By admin | Updated: June 3, 2014 02:21 IST

बसेसची तोडफ ोड : सुमारे ३५ कार्यकर्ते ताब्यात; दुकाने बंद; पोलीस बंदोबस्त तैनात

बसेसची तोडफ ोड : सुमारे ३५ कार्यकर्ते ताब्यात; दुकाने बंद; पोलीस बंदोबस्त तैनातनाशिक : फे सबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर महापुरुषांची तसेच देवीदेवतांची आक्षेपार्ह छायाचित्रे व मजकूर प्रसिद्ध केल्याचे पडसाद नाशिक शहरातही उमटले़ शनिवारी रात्रीपासून शहरात तणाव असून, रविवारी सकाळी संभाजी ब्रिगेड व छावाच्या कार्यकर्त्यांनी द्वारका व त्र्यंबक नाक्यावर रास्ता रोको केला़ बसेसची तोडफ ोड व आंदोलन करणार्‍या सुमारे ३५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांनी दुकाने बंद केली असून, संपूर्ण शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ दरम्यान, या प्रकरणी अखिल भारतीय मराठा महासंघाने पंचवटी पोलीस ठाण्यात फि र्याद दिली आहे़छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, देवी- देवता यांची आक्षेपार्ह छायाचित्रे व बदनामीकारक मजकूर शनिवारी रात्रीच्या सुमारास फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर प्रसिद्ध झाल्याची वार्ता सोशल नेटवर्किंगवरूनच सार्‍या शहरात पसरली़ याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक शहरातही उमटले़ रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास छावा, संभाजी ब्रिगेड तसेच मराठा संघटनांनी त्र्यंबक नाका सर्कल तसेच द्वारका परिसरात रास्ता रोको आंदोलन केले़ पोलिसांनी पाचच मिनिटांत हे आंदोलन मोडून काढून संघटनांच्या सुमारे ३५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले़द्वारका परिसरात करण्यात आलेले हे रास्ता रोको आंदोलन व रस्त्याच्या कामामुळे या भागात सुमारे दीड ते दोन तास वाहतुकीची कोंडी झाली़ संघटनांनी केलेल्या या आंदोलनात एसटीला लक्ष्य करण्यात आले. त्यामध्ये शहरात सुमारे आठ बसेसची तोडफ ोड झाल्याचे वृत्त आहे़ त्यामध्ये त्र्यंबक नाक्यावर तीन, सातपूरला दोन, द्वारका व ठक्कर बझार परिसरात प्रत्येकी एका बसच्या काचा फ ोडण्यात आल्या़ दरम्यान, शहरातील तणावग्रस्त परिस्थिती पाहता शालिमार, एम़ जी़ रोड, कॉलेजरोड, सातपूर, सिडको भागातील अनेक दुकाने बंद करण्यात आली़दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहावी यासाठी पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी शनिवारी रात्रीपासूनच शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता़ द्वारका व त्र्यंबकनाका येथील रास्ता रोकोप्रसंगी पोलीस आयुक्त सरंगल, उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, पोलीस निरीक्षक मधुकर कड, रमेश पाटील, स्ट्रायकिंग फ ोर्स यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता़ (प्रतिनिधी) बातमीला जोड आहे़