सहा बसेसच्या काचा फ ोडल्या : अफ वांचे पीक; कार्यकर्ते ताब्यात; पोलीस बंदोबस्तनाशिक : फे सबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर प्रसिद्ध झालेली महापुरुषांची तसेच देवीदेवतांची आक्षेपार्ह छायाचित्रे व बदनामीकारक मजकुराचे पडसाद नाशिक शहरातही उमटले़ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटना तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या सहा बसेस व कारच्या काचा फ ोडल्या, तर रविवारी दुपारी मेनरोडवरील दोन दुकानेही फ ोडण्यात आली़ द्वारका व त्र्यंबक नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करणार्या छावा व संभाजी ब्रिगेडच्या सुमारे ३५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़रविवारी दिवसभर संपूर्ण शहरात अफ वांचे पीक आले होते़ पोलिसांकडे अमूक ठिकाणी दगडफे क, तमूक ठिकाणी जमाव जमल्याच्या बातम्या येत असल्याने पोलीस यंत्रणेची चांगली दमछाक झाली़ जुन्या नाशकातील शिवाजी चौक - अमरधामरोडवर काही समाजकंटकांनी दगडफे क केल्याचीही घटना घडली़ या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता पसरली होती़ कॉलेजरोड, मेनरोड, शालिमार येथील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली़ फे सबुकवरील या आक्षेपार्ह मजकुरासंदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे, तर सरकारवाडा पोलीस ठाण्यात रास्ता रोको आंदोलन करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी छावा संघटनेचे पाच व इतर दोन अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ द्वारका परिसरातील हिंदू एकता आंदोलनचे रामसिंग बावरी, करणसिंग बावरी, छावा तसेच संभाजी ब्रिगेड आदिंसह विविध संघटनांच्या सुमारे ३५ ते ४० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांसह शहरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांच्यासह परिमंडळ-१ व २ मधील पोलीस निरीक्षक शहरातील घडामोडींवर लक्ष ठेवून होते़फ ोटो :- ०१ पीएचजेएन १५५ व १५६शिवाजी चौक - अमरधामरोडवर अज्ञात समाजकंटकांनी केलेली दगडफे क़ या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दाखल झालेले पोलीस कर्मचारी़
महापुरुषांची बदनामी; नाशकातही तणाव (पान १ साठी)
By admin | Updated: June 2, 2014 00:16 IST