शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या आधुनिक चाकावर मिळणार मातीला आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 00:29 IST

केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबक विद्यामंदिर येथे आयोजित दहादिवसीय कुंभारकाम प्रशिक्षण वर्गाचा समारोप खादी ग्रामोद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव खन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र आणि आधुनिक यंत्रे मोफत वाटप करण्यात आली. पारंपरिक चाकावरील मातीला आकार देण्याचे काम आता विजेच्या चाकावर होणार आहे.

सातपूर : केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबक विद्यामंदिर येथे आयोजित दहादिवसीय कुंभारकाम प्रशिक्षण वर्गाचा समारोप खादी ग्रामोद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव खन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र आणि आधुनिक यंत्रे मोफत वाटप करण्यात आली. पारंपरिक चाकावरील मातीला आकार देण्याचे काम आता विजेच्या चाकावर होणार आहे.बुधवारी दुपारी या प्रशिक्षण शिबिराचा समारोप केंद्रीय खादी ग्रामोद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव खन्ना, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव जगदाळे, माती कला विभागाचे राष्ट्रीय चेअरमन दत्तात्रय डाळजकर, रंगनाथ सूर्यवंशी, सोमनाथ सोनवणे, राजेंद्र सावंदे, गणेश आहेर, अशोक प्रजापती, कृष्णा सोनवणे, नीलेश सोनवणे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. सतीश बोरसरे, लक्ष्मण बोरसरे, मनोज प्रजापती आदींनी आधुनिक कलेचे प्रशिक्षण दिले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र तसेच खादी ग्रामोद्योगकडून मोफत यंत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविक मोहनराव जगदाळे यांनी केले. स्वागत गणेश आहेर यांनी केले. राजेंद्र सावंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर रंगनाथ सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी नवनाथ जाधव, ज्ञानेश्वर भागवत, श्यामराव जोंधळे, संजय भागवत, गुलाबराव सोनवणे, तुळशीराम मोरे, प्रा. शांतीलाल काळे आदी उपस्थित होते.आधुनिक तंत्रज्ञानाची जोडखादी ग्रामोद्योग आयोग मुंबई यांच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड धरून पारंपरिक कुंभारकाम करणाऱ्या कारागिरांना विजेच्या चाकावर आधुनिक प्रशिक्षण देऊन त्यांच्या व्यवसाय विकासात भर पडावी यासाठी त्र्यंबक विद्यामंदिर (खादी ग्रामोद्योग विभाग) येथे दि.१३ ते २२ मे दरम्यान दहा दिवसांचे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यातील ४० कुंभार व्यावसायिक सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक