शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांना घेऊन धावली सहावी ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 23:58 IST

नाशिक : जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात कामधंदा करणाºया परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट धरली असून, रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून सुमारे चाळीस हजारांवर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. यामध्ये बसेसने प्रवास करणाºया मजुरांची संख्या सर्वाधिक आहे, तर बुधवारी सकाळी नाशिकरोड रेल्वेस्टेशनमधून मजुरांना घेऊन सहावी ट्रेन बिहारच्या दिशेने धावली.

नाशिक : जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात कामधंदा करणाºया परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट धरली असून, रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून सुमारे चाळीस हजारांवर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. यामध्ये बसेसने प्रवास करणाºया मजुरांची संख्या सर्वाधिक आहे, तर बुधवारी सकाळी नाशिकरोड रेल्वेस्टेशनमधून मजुरांना घेऊन सहावी ट्रेन बिहारच्या दिशेने धावली.कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे जिल्ह्यातील मजुरांचे लोंढे गावाच्या दिशेने निघाले आहेत. गावाकडे जाणाऱ्यांना मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून रेल्वे गाड्या तसेच बसेसची व्यवस्था केली जात आहे. गावी जाण्यासाठी तहसीलदारांकडे नोंदणी केलेल्या आणि संबंधित राज्यांकडून एनओसी प्राप्त झाल्यानंतर संबंधित मजुरांसाठी श्रमिक रेल्वे गाडीची व्यवस्था केली जाते. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून आत्तापर्यंत सहा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत तर एक गाडी औरंगाबाद येथून सुटल्याने नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना सदर गाडीतून रवाना करण्यात आले. या सर्व गाड्यांमधून ७४५३ मजुरांनी प्रवास केला आहे.बुधवारी (दि.२०) नाशिक ग्रामीण विभागातून सहावी रेल्वे गाडी बिहार राज्यातील हाजीपूर येथे १५८७ प्रवाशांना घेऊन रवाना झाली. या प्रवाशांच्या तिकिटाचे सुमारे ११ लाख रुपये महाराष्टÑ शासनाने भरले आहेत. गेल्या नऊ तारखेपासून सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीत सर्वाधिक प्रवासी हे उत्तर प्रदेशचे आहेत. ग्रामीण भागात अजूनही तहसीलदारांकडे परप्रांतीय मजुरांकडे नावनोंदणी सुरूच असून, येत्या ३१ तारखेच्या आत जास्तीत जास्त प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची तयारी केली जात आहे.जिल्ह्यातील प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनानुसार शहरी भागाची जबाबदारी ही महापालिका आणि पोलीस उपायुक्तांकडे देण्यात आलेली आहे, तर ग्रामीण भागातील जबाबदारी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सांभाळत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून सुरू असलेल्या प्रवासी वाहतुकीतून सर्वाधिक ३३ हजार ८८३ प्रवाशांची वाहतूक अनेक राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे. राजस्थान, बिहार, केरळ, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, ओडिशा आदी राज्यांतील प्रवाशांची वाहतूक करण्यात आलेली आहे.-----------------------------------------------जिल्ह्यातील प्रवाशांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठीच्या जबाबदारीचे नियोजन यापूर्वीच करण्यात आलेले आहे. मनपा हद्दीसाठी मनपा उपायुक्त व पोलीस उपायुक्त हे नोडल अधिकारी आहेत. तर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी ग्रामीण भागासाठी कामकाज पाहात आहेत.- नितीन मुंडावरे, उपजिल्हाधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक