शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

सोळा वर्षांची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:00 IST

देवळा : तालुक्यातील कनकापूर येथील राजमाता जिजाऊ संस्था व केदा आहेर प्रणीत श्रीकृष्ण मंडळाला गत सहा वर्षांत तीन तालुकास्तरीय व दोन वेळा ग्रामीण जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. देवळा तालुक्यात ७० गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली असून, २० गावात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देएक गाव, एक गणपती : कनकापूरचे श्रीकृष्ण मंडळ

संजय देवरे।लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : तालुक्यातील कनकापूर येथील राजमाता जिजाऊ संस्था व केदा आहेर प्रणीत श्रीकृष्ण मंडळाला गत सहा वर्षांत तीन तालुकास्तरीय व दोन वेळा ग्रामीण जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. देवळा तालुक्यात ७० गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली असून, २० गावात ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे.कनकापूर येथे १६ वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते स्व. भिका शिंदे यांनी गावातील दिनकर मोहिते, योगेश गांगुर्डे, भारत मोहिते या युवकांच्या मदतीने गावाची एकजूट अबाधित राहावी या उद्देशाने ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना मांडली व श्रीकृष्ण मित्रमंडळाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी विविध उपक्रम राबवित गणेशोत्सव साजरा केला जातो.प्रत्येक वर्षी मंडळामार्फत वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यातील कौतुकास्पद गोष्ट म्हणजे गणपती आरतीचा मान हा गावातीलसर्व जातिधर्माच्या लोकांना दिला जातो. गणेशोत्सव काळात येणाऱ्या मोहरम सणाच्या दिवशी गावातील मुस्लीम जोडप्याला गणेश पूजनाचा मान दिला जातो. त्यातून सामाजिक एकता व बांधिलकी जोपासण्याचे काम केले जाते. तसेच मंडळाकडून कायम पर्यावरणपूरक काम केलेजाते. ग्रामस्वच्छता, व्यसनमुक्ती, स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अवयवदान जनजागृती, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्हॉलीबॉल, कबड्डीसारख्या मैदानी खेळांच्या स्पर्धा, वृक्षारोपण, रक्तदान यांसारखे समाजोपयोगी उपक्र म राबविले जात आहेत.नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस विभागामार्फत सन २०१८ मध्ये विघ्नहर्ता गणेशोत्सव बक्षीस योजना राबविण्यात आली होती. कनकापूर येथील राजमाता जिजाऊ संस्था व केदा आहेर प्रणीत श्रीकृष्ण मंडळाने भाग घेतला होता. या मंडळाने गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविले होते. याची पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दखल घेऊन या मंडळाची जिल्हास्तरावर निवड करून ग्रामीण भागातून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे.

गावात एकजूट कायम राहावी या उद्देशाने ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना सोळा वर्षांपासून राबविण्यात येत आहे. यावर्षी वडाच्या झाडावर लाकडी भुशाच्या मदतीने पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. विविध पर्यावरणपूरक उपक्र म राबविण्यात येत असल्यामुळे सर्व स्तरांतून सतत प्रोत्साहन मिळत आहे. यामुळे कामाचा उत्साह वाढतो. यावर्षी मंडळातर्फेकांचणे, कनकापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच माध्यमिक शाळेला तीन संगणक भेट देणार आहोत.- जगदीश शिंदेअध्यक्ष, श्रीकृष्ण मंडळ, कनकापूर