शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सहा वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:22 IST

जुन्या भांडणाची कुरापत काढून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डीफाटा येथे २०१६साली प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. या हल्ल्यातील गणेश लक्ष्मण शिंदे यास सोमवारी (दि.११) जिल्हा व सत्र न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दोषी धरले. जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी सहा वर्षे साधा कारावासाची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देतक्रारदार फितूर : परिस्थितीजन्य पुरावा

नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डीफाटा येथे २०१६साली प्राणघातक हल्ल्याची घटना घडली होती. या हल्ल्यातील गणेश लक्ष्मण शिंदे यास सोमवारी (दि.११) जिल्हा व सत्र न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे दोषी धरले. जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. नंदेश्वर यांनी सहा वर्षे साधा कारावासाची शिक्षा सुनावली.याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना ३ मे २०१६ रोजी पाथर्डीफाटा भागात झाली होती. या खटल्यात जखमी झालेला अंकुश रमेश कुशाळकर व फिर्यादी असलेला त्याचा भाऊ यांनी साक्ष फिरवून फितुरी केली; मात्र तपासी अधिकारी उपनिरीक्षक संघर्ष श्रृंगारे यांनी गुन्ह्याचा पाठपुरावा करत परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयाला सादर केले. तसेच गुन्ह्यातील पंच व वैद्यकीय अधिकारी यांनी न्यायालयात दिलेली साक्षदेखील महत्त्वाची ठरली. त्याअधारे न्यायालयाने शिंदे यास दोषी धरले व सहा वर्षे कारावास व अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने शिक्षेत वाढ करण्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय