शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ठाणगाव येथे सहा वर्षाचा बिबट्या जेरबंद; दहशतीतून झाली शेतकऱ्यांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2023 10:58 IST

लावदरी परिसरात एक बिबटया जेरबंद झाला असला तरी आणखी एक बिबटया मुक्त असून त्याला पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

नितीन शिंदे

ठाणगाव (नाशिक):  सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील लावदरी परिसरात शुक्रवारी (दि.१२) रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास  सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबटया जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पंधरा दिवसापूर्वी लावदरी परिसरातील शेतकरी रमेश हरी पानसरे यांच्या गोठ्यातून दोन वासरे बिबटयाने ओढून ठार मारले होते पण वासरे जंगलात ओढून नेल्याने वासराचा कोणताही पुरवा नसल्याने वनविभागाच्या वतीने पंचनामा केला नाही. त्यानंतर पानसरे यांनी सदर ठिकाणी बिबटयाचा दहशत असल्याने वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली त्यानंतर लावदरी परिसरात पिंजरा लावण्यात आला. शुक्रवारी (दि.१२) रोजी पहाटच्या सुमारास बिबटया पिंजऱ्यात अडकला त्यानंतर पानसरे यांचा मुलगा विक्रम हा शेतात गेल्या असता त्यास बिबटयाचा डरकाळ्या येऊ लागल्याने त्याला बिबटया पिंजऱ्यात अडकल्याचे दिसून आले. 

वनविभागाच्या वतीने वनपाल सुनिल झोपो, वनरक्षक किरण गोर्डे, पी.जी.बिन्नर,वनमंजूर भारत गांगड, काशिनाथ कातोरे,आजय गि-हे,बाळू गांगड यांनी सदर जखमी अवस्थेत असलेल्या बिबटयाला मोहदरी येथील वनउद्योनात नेण्यात आले.  बिबटयाने पिंजऱ्यात असणाऱ्या तारेला ओढण्याचा प्रयत्न केल्याने व पिंजऱ्याला धडकी दिल्याने बिबटयाला तोंडाला जखम झाली असून त्यास मोहदरी येथील वनउद्योनात ठेवण्यात आले आहे पशु वैद्यकीय अधिकारी थोरात यांनी जखमी बिबटयावर उपचार करुन वनविभागाचा देखरेखीत ठेवण्यात आला आहे.

बिबटयाची दशहत अजूनही कायमलावदरी भागात झांडाचे प्रमाण जास्त असल्याने या भागात बिबटयाच्या जोडीचा वावर कायम आहे. गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढल्याने व जंगलातील वृक्षाची पानगळ झाल्याने वन्यप्राणानां  लपण्यासाठी सावली नसल्यामुळे बिबटे व अन्य वन्यप्राणी गावकुसाकडे अन्न व पाण्याच्या शोधार्थ फिरतानां दिसत आहे. लावदरी परिसरात एक बिबटया जेरबंद झाला असला तरी आणखी एक बिबटया मुक्त असून त्याला पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्या