जिल्ह्यातून ७० संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रत्येक संघाने चांगली कामगिरी करत विजय मिळविला. यात १४ वर्ष वयोगटात प्रशांत रेवगडे, नैतिक रेवगडे, संस्कार शिंदे, महेश जाधव, आशिष जाधव, सत्यम रेवगडे तर मुलींच्या गटात अक्षरा रेवगडे, साक्षी पाटोळे, श्रावणी शिंदे, पुजा रेवगडे, जयश्री शिंदे, सानिका पाटोळ यांचा समावेश आहे. १७ वर्ष वयोगटात अजय रेवगडे, अभय पाटोळे, रोशन पाटोळे, नवनाथ पाटोळे, सुरज पाटोळे, सचिन शिंदे तर मुलींच्या गटात साक्षी रेवगडे, धनश्री शिंदे, साक्षी साठे, गिता पाटोळे, पायल पाटोळे, श्रुती शिंदे यांचा सहभाग आहे. १९ वर्ष वयोगटात शिवराज शेजवळ, प्रतिक शिंदे, अभिषेक रेवगडे, मनोज रेवगडे, दिनेश पाटोळे तर मुलींच्या गटात अनुष्का पाटोळे, शुभांगी पाटोळे, अश्विनी पाटोळे, निकिता रेवगडे, प्रतिक्षा रेवगडे, मुक्ता सदगीर या खेळाडूंनी यश मिळविले. त्यांना मुख्याध्यापक एस. बी. देशमुख व शिक्षिका एम. एम. शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
पाडळी माध्यमिक विद्यालयाचे सहाही संघ विभागीय पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 17:09 IST