शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

विवाहितेच्या छळप्रकरणी सहा संशयिताना अटक

By admin | Updated: June 1, 2014 00:48 IST

निफाड : नवविवाहितेच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आणि जमीन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या एकूण सहा जणांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सर्व संशयिताना निफाड पोलिसांनी अटक केली आहे.

निफाड : नवविवाहितेच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आणि जमीन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या एकूण सहा जणांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, सर्व संशयिताना निफाड पोलिसांनी अटक केली आहे.निफाड येथील माहेर असलेली नवविवाहिता सौ. कावेरी अभिजित सोनवणे (२२) हिने सासरच्या मंडळींविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादित म्हटले आहे की, निफाडचे माहेर असलेली कावेरी हिचे लग्न मागील वर्षी (मातेरेवाडी, ता. दिंडोरी) येथील अभिजित देवराम सोनवणे यांच्याशी झाले. पहिल्या एक महिन्यात सासरच्यांनी चांगले वागवले; परंतु नंतर सासरच्या मंडळींनी कावेरीला त्रास देण्यास सुरुवात केली. तुझे डोळे तिरळे आहेत. तुला स्वयंपाक येत नाही, शिवाय तुझ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी व जमीन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून पती अभिजित याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. कावेरीच्या मामांनी व चुलत्याने सासरच्या मंडळींना भेटून तिला मारहाण करू नका ती चार महिन्यांची गरोदर आहे, असे सांगितल्यानंतरही सासरच्या मंडळींनी कावेरीला माहेरी काढून दिले. याप्रकरणी कावेरीचा पती अभिजित देवराम सोनवणे, देवराम सीताराम सोनवणे (सासरा), पुष्पा देवराम सोनवणे (सासू), योगेश देवराम सोनवणे (दीर), अनुजा योगेश सोनवणे (जाऊ), पांडुरंग नामदेव मोगल (मामे सासरे) या एकूण सहाजणांविरुद्ध गुन्हा नांेदविण्यात आला असून, वरील सर्व सहा जणांना निफाड पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट करीत आहेत. या सर्वांना निफाड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या सर्वांची जामिनावर मुक्तता केली. (वार्ताहर)