शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन जनशक्तीचा आघाडीला ११ जागांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:19 IST

येत्या विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी पिपल्स रिपब्लिकन पक्ष आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया यांची एकत्रित रिपब्लिकन जनशक्ती आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीकडे ११ जागांचा प्रस्ताव दिला असून, यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित असल्याची माहिती आघाडीचे संयोजक व पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली.

ठळक मुद्देजोगेंद्र कवाडे : शनिवारचा महामेळावा पुरामुळे स्थगित

नाशिक : येत्या विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी पिपल्स रिपब्लिकन पक्ष आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया यांची एकत्रित रिपब्लिकन जनशक्ती आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीकडे ११ जागांचा प्रस्ताव दिला असून, यासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित असल्याची माहिती आघाडीचे संयोजक व पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली. नाशिकमध्ये येत्या १७ आॅगस्ट रोजी होणारा महामेळावा राज्यातील पूरपरिस्थितीमुळे स्थगित करण्यात आल्याचेही ते म्हणाले.नाशिक दौऱ्यावर आलेल्या प्रा. कवाडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी आमची बांधीलकी असून, तशा विचारप्रणालीच्या पक्षांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणुकीतही रिपब्लिकन आघाडीने दोन्ही कॉँग्रेससोबत राहण्याचे ठरविले आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये हा त्यामागचा प्रयत्न आहे. या आघाडीत बहुजन वंचित आघाडी किंवा धर्मनिरपेक्ष विचारांचे आणखी कोणी आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागतच असेल. चळवळीतील सर्व नेत्यांनी अहंकार बाजूला ठेवून सत्ताधारी पक्षांना बाजूला ठेवण्यासाठी एकत्रित आले पाहीजे.याप्रसंगी शशिकांत उन्हवणे, गणेश उन्हवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.लवकरच मतदारसंघनिहाय बैठकायेत्या निवडणुकीत रिपब्लिकन आघाडीला ११ जागा मिळाव्यात असा प्रस्ताव काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला आहे. त्यानुसार मतदारसंघनिहाय लवकरच बैठका घेण्यात येणार आहेत. काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याच्या विषयावर बोलताना प्रा. कवाडे यांनी, सदरचे कलम रद्द करण्यासाठी संविधानिक आधार देण्याची गरज होती. जम्मू-काश्मीरच्या राज्य सरकारने हे कलम रद्द करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असता, तरी हे रद्द झाले असते. यापूर्वी केंद्रशासित प्रदेशाचे राज्य झाले आहे. परंतु एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेश होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणJogendra kawadeजोगेंद्र कवाडे