शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये २० शाळांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा जिल्ह्यातून सहा शाळांचे प्रस्ताव : दोन ‘ओजस’ शाळा करणार १८ ‘तेजस’ शाळांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:14 IST

नाशिक : नववर्षात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शाळांमधून १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांची निर्मिती करण्यात येणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील दोन शाळांचाही समावेश करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे‘तेजस’ शाळा निर्माण करण्याचा निर्णय पटसंख्येची अट शिथिल

नाशिक : नववर्षात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि शालेय शिक्षण विभागाच्या शाळांमधून १०० आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांची निर्मिती करण्यात येणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील दोन शाळांचाही समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे २० शाळांना येणाºया नवीन वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. राज्य सरकारने राज्यभरात १० ‘ओजस’ आणि ९० ‘तेजस’ शाळा निर्माण करण्याचा निर्णय जाहीर केला असून, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही आंतराराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळणार आहे.नाशिक जिल्ह्यातून जिल्हा परिषदेच्या शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी सहा शाळांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षाकडून या शाळांना मार्गदर्शन मिळणार आहे. राज्यात कोकण (मुंबई वगळून), पुणे (पुणे शहर वगळून)- प्रत्येकी एक, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर- प्रत्येकी दोन ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळांची निर्मिती केली जाणार आहे. या शाळा त्यांच्या परिसरातील अन्य नऊ शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यासाठी मदत करतील. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातीन दोन ओजस शाळा अन्य १८ शाळांनाही आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी मदत करणार असल्याने जिल्ह्यात एकूण २० शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थी पटसंख्या प्रत्येकी दोन तुकड्यांसाठी पहिली ते पाचवीसाठी ३००, सहावी ते आठवीसाठी २१०, नववी ते दहावीसाठी १६० विद्यार्थी अपेक्षित असून, किमान एक हजार पटसंख्या सामावण्याची क्षमता आवश्यक आहे. एखाद्या विभागात दोन तुकड्यांच्या शाळांनी अर्ज न केल्यास एक तुकडी असलेल्या शाळांना प्राधान्य दिले जाणार असून, गेल्या काही वर्षांत शाळेतील पटसंख्येत झालेली वाढ आणि शाळेत परिसरातील गावांमधून आपल्या गावातील शाळेऐवजी या शाळेत येणारे विद्यार्थी, शाळेतील शिक्षकांची इच्छा आदींचा विचार करून शिक्षण आयुक्त संबंधित शाळेच्या पटसंख्येची अट शिथिल करण्यास मान्यता देणार आहेत. या निकषांचा अभ्यास करून नाशिक जिल्ह्यातून तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकारी व गटविकास अधिकाºयांनी शाळांची तपासणी करून सहा शाळांचे प्रस्ताव महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडे पाठविले असून, यातील दोन शाळांची ओजस शाळा म्हणून निवड होणार आहे.