शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी मोहिमेत सिडकोत सापडले सहा रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 18:03 IST

सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेची चिंता वाढली असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ...

ठळक मुद्देप्रभाग २५ मनपा वैद्यकीय पथक घरोघरी

सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेची चिंता वाढली असून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी खुटवडनगर ते आयटीआयपूल दरम्यानचा रस्ता तसेच परिसर वाहतुकीसाठी प्रतिबंधित करण्यापाठोपाठ सोमवारी प्रभाग क्रमांक २५मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. या तपासणीत सहाजण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत.सिडको परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर अनेक उपाययोजना केल्या जात असून, जुन्या सिडकोतील महाराणा प्रताप चौक या भागातील रस्ते चौदा दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर खुटवडनगर परिसर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद केला आहे. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबरच आता नगरसेवकांनीही पुढाकार घेतला आहे. सोमवारी शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक २५ मध्ये परिसरातील संपूर्ण नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत महापालिका प्रशासनातील डॉक्टर तसेच इतर कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी याची सुरुवात पाटीलनगर भागातून करण्यात आली. यावेळी प्रत्येक नागरिकांच्या घरात जाऊन त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यात नागरिकांचे तापमान तसेच आॅक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. तपासणीत सुमारे २५हून अधिक नागरिकांची संशयित कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील सहा रुग्ण कोरोनाबाधित आढळून आल्याने मनपाने त्वरित त्यांना उपचारार्थ हलविले. यावेळी नागरिकांना व्हिटामिनच्या औषधांचे वितरण करण्यात आले. या मोहिमेत मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. दीपिका मोरे, अशोक गायकवाड, अनुजा शेवाळे, डॉ संदीप मंडलेचा, पवन मटाले, गोपी गिलबिले, नीलेश कुलथे आदी सहभागी झाले होते.:

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या