शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कोरोनाचे आणखी सहा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:40 IST

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून, दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात आठ रुग्ण दगावले होते, त्यानंतर बुधवारी (दि.१७) एकूण सहा जणांचा बळी गेला. त्यामुळे आता मृतांची संख्या ४६ झाली आहे.

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून, दोन दिवसांपूर्वी एकाच दिवसात आठ रुग्ण दगावले होते, त्यानंतर बुधवारी (दि.१७) एकूण सहा जणांचा बळी गेला. त्यामुळे आता मृतांची संख्या ४६ झाली आहे. तर एकाच दिवसात ५३ नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची संख्या ८६१ वर गेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच आहे. आता बाधितांची आणि मृत्यूची संख्या हादरविणारी ठरली आहे. वाढती रुग्णसंख्या चिंताजनकशहरात एकाच दिवसात ५३ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ८६१ झाली आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने प्रतिबंधित क्षेत्र १५० झाले आहेत.बाधितांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३३९ झाली आहे.------------------शहरात गेल्या आठवड्यात एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी आठ जणांचा, तर बुधवारी (दि. १७) सहा जणांचा मृत्यू झाला. यात वडाळा येथील एका ५८ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. त्यास ४ जून रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.जुने नाशिक आणि परिसरातील काही जणांचा मृत्यू झाला आहे. यात शालिमार येथील ६७ वर्षाचा इसमाचा समावेश आहे. त्यास १५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. त्याचा मंगळवारी मृत्यू झाला.गुरुद्वारा रोड भागातील ६५ वर्षीय पुरुषाला मंगळवारी (दि.१६) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दूधबाजारातील ४५ वर्षीय महिलेचादेखील मृत्यू झाला आहे.पंचवटीतील एका ७० वर्षीय वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला २५ मे रोजी दाखल करण्यात आले होते.विनयनगर येथील कालिका पेट्रोलपंप परिसरात ४५ वर्षीय इसमाला १० जून रोजी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :Nashikनाशिक