शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत मनपाला ४४० कोटी रुपये प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:20 IST

‘एक राष्टÑ, एक कर’ या संकल्पनेंतर्गत १ जुलैपासून जीएसटी तथा वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महापालिकांना दरमहा देण्यात येणाºया अनुदानात नियमितपणा असेल किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती; मात्र सरकारने दिलेला शद्ब पाळत नियमितपणे दरमहा अनुदान अदा केले जात असून, आतापर्यंत सहा महिन्यांत ४४० कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. सरकारने माहे डिसेंबरचेही अनुदान वितरित करण्याचे आदेश नुकतेच काढले आहेत.

नाशिक : ‘एक राष्टÑ, एक कर’ या संकल्पनेंतर्गत १ जुलैपासून जीएसटी तथा वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महापालिकांना दरमहा देण्यात येणाºया अनुदानात नियमितपणा असेल किंवा नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती; मात्र सरकारने दिलेला शद्ब पाळत नियमितपणे दरमहा अनुदान अदा केले जात असून, आतापर्यंत सहा महिन्यांत ४४० कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत. सरकारने माहे डिसेंबरचेही अनुदान वितरित करण्याचे आदेश नुकतेच काढले आहेत.  महापालिकेत जकात रद्द होऊन २१ मे २०१३ रोजी एलबीटी लागू करण्यात आला होता. राज्यात भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यानंतर १ आॅगस्ट २०१४ रोजी शासनाने ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द करत त्या मोबदल्यात महापालिकेला अनुदान देण्यास सुरुवात केली होती, तर ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीतून मिळणाºया एलबीटी वसुलीचे अधिकार महापालिकांकडेच ठेवले होते. दरवर्षी एकूण एलबीटीच्या वसुलीवर ८ टक्के वाढ देत शासनाने अनुदानाची रक्कम निश्चित केली होती. शिवाय, एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराची रक्कमही देण्यास प्रारंभ केला होता. गेल्या तीन वर्षांपासून शासनाकडून असे दुहेरी अनुदान महापालिकेला प्राप्त होत राहिले. मात्र, १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर महापालिकेने एलबीटीच्या वसुलीला पूर्णविराम दिला. त्याऐवजी शासनामार्फत  महापालिकांना दरवर्षी ८ टक्के वाढ गृहीत धरून भरपाई अनुदान दिले जात आहे. मात्र, शासनामार्फत दरमहा नेमके किती अनुदान मिळेल आणि ते वेळेत मिळेल की नाही, याबाबत संभ्रमावस्था व्यक्त केली जात होती. विधिमंडळातही जीएसटी अनुदान वेळेत मिळेल की नाही, याबाबत विरोधकांनी आक्षेप घेतले होते. परंतु, जीएसटी विधेयकानुसार, महापालिकांचा आर्थिक डोलारा ढासळू नये, यासाठी दर महिन्याच्या पाच तारखेच्या आत त्यांच्या खात्यावर भरपाई अनुदान जमा करण्याचे बंधन केंद्राने राज्य सरकारांना घातले आणि सरकारनेही त्याचे गेल्या सहा महिन्यांत तंतोतंत पालन केल्याचे दिसून येते. आतापर्यंत सहा महिन्यांत महा पालिकेला ४४० कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. माहे डिसेंबरचेही ७३.४० कोटी रुपये अनुदान नोव्हेंबरच्या २८ तारखेलाच वितरित करण्याचे आदेश निघाले आहेत. महापालिका निश्चिंत दरमहा नियमितपणे जीएसटीचे भरपाई अनुदान प्राप्त होत असल्याने महापालिका निश्चिंत आहे. त्यामुळे किमान महापालिकेच्या कर्मचाºयांचे वेतन अदा करणे सोपे जात आहे. सदर अनुदान नियमितपणे वेळेत मिळाले नसते तर त्याचा पहिला फटका कर्मचाºयांना बसला असता. महापालिकेला आता मार्च २०१८ पर्यंत २२० कोटी २० लाख रुपये अनुदान मिळणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGSTजीएसटी