शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत सहा लाख घरभेटींचे आव्हान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:34 IST

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याच्या उपक्रमात शिक्षकांनी काम करण्यास नकार दिल्याने आयोगाने दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत जिल्ह्यातील सहा लाख कुटुंबांना भेटी देण्याचे उद्दिष्ट साधण्याचे मोठे आव्हान निवडणूक शाखेसमोर उभे राहिले असून, काम न करणाºया बीएलओंवर फौजदारी कारवाई करण्याचा पर्याय खुला असला तरी, आता त्याविरोधात शिक्षकांनी आक्रमक होत थेट बेमुदत आमरण उपोषणाचाच इशारा दिल्याने निवडणूक शाखा पेचात पडली आहे.

नाशिक : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याच्या उपक्रमात शिक्षकांनी काम करण्यास नकार दिल्याने आयोगाने दिलेल्या आठ दिवसांच्या मुदतीत जिल्ह्यातील सहा लाख कुटुंबांना भेटी देण्याचे उद्दिष्ट साधण्याचे मोठे आव्हान निवडणूक शाखेसमोर उभे राहिले असून, काम न करणाºया बीएलओंवर फौजदारी कारवाई करण्याचा पर्याय खुला असला तरी, आता त्याविरोधात शिक्षकांनी आक्रमक होत थेट बेमुदत आमरण उपोषणाचाच इशारा दिल्याने निवडणूक शाखा पेचात पडली आहे.  मतदार पुनरीक्षणाची मोहीम १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत राबविण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित करून दि. १५ ते ३० नोव्हेंबर या काळात बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदाराची व त्याच्या कुटुंबाची माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  नाशिक जिल्ह्यात सुमारे सव्वासात लाख कुटुंबे असून, शुक्रवारपर्यंत बीएलओंनी सव्वा लाख कुटुंबांना भेटी देऊन त्यांची माहिती संकलित केली आहे. आता निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीसाठी फक्त आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, या आठ दिवसांच्या कालावधीत सहा लाख कुटुंबांची माहिती गोळा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यातही शुक्रवारी मालेगावी अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांनी थेट मालेगावच्या निवडणूक अधिकाºयांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून बीएलओंचे काम ऐच्छिक करण्यात यावे व त्यातून महिला शिक्षकांना वगळण्यात यावे अन्यथा दोन दिवसांनंतर मालेगावी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आजवर शिक्षक संघटनांनी फक्त निवेदने दिली, आता मात्र त्यांनी थेट आंदोलनाचे अस्त्र उगारल्याने प्रकरण चिघळत चालले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार १५ डिसेंबरपर्यंत काम न करणाºयांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करणे बंधनकारक असल्यामुळे निर्माण झालेला पेच पाहता आठ दिवसांत काय घडामोडी होतात त्याकडे साºयांचे लक्ष लागून आहे. बीएलओ म्हणून शिक्षकांचीच नेमणूक करण्यात आल्याने व बहुतांशी शिक्षकांनी काम करण्यास नकार दिल्याने ३० नोव्हेंबरपर्यंत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने या मोहिमेस पंधरा दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. परंतु तरीही शिक्षकांचे असहकार्य कायम असून, काम न करणाºया बीएलओंवर फौजदारी कारवाई करण्याची तयारी निवडणूक शाखेने केली आहे. अर्थात, सर्वच शिक्षकांनी या कामास नकार दिलेला नसून काही बीएलओंनी कामही सुरू केले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक