शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाखांचा गुटखा मुंबई नाका पोलिसांकहून जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 15:16 IST

अवैधरित्या गुटख्याचा मोठा साठा वाहून आणला जाणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली.

ठळक मुद्देरंगबाज पान मसाला गुटख्याचे पोते आढळून आले. उड्डाणपूलावर सापळा रचला.

नाशिक : राज्य शासनाने प्रतिबंध घातलेल्या गुटख्याची शहरात सर्रासपणे अवैध वाहतूक केली जाणार असल्याची खात्रिशीर गुप्त माहिती मुंबईनाका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी इंदिरानगर येथे उड्डाणपूलावर सापळा रचला. संशयास्पद पांढऱ्या रंगाची पीक-अप जीप पूलावरून मार्गस्थ होत असताना पोलिसांनी रोखली. जीपची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे ६ लाख रूपयांचा रंगबाज पान मसाला गुटख्याचे पोते  आढळून आले.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी सचिन करंजे, यांना अवैधरित्या गुटख्याचा मोठा साठा वाहून आणला जाणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली. त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांना सांगितले. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे, उपनिरिक्षक रेश्मा अवतारे यांच्यासह पथकाने द्वारका ते इंदिरानगर दरम्यान उड्डाणपूलावर सापळा रचला. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास इंदिरानगर बोगद्याजवळ उड्डाणपूलावर एक पांढ-या रंगाची जीप (एम.एच१५ डीके ४३५२) मुंबईकडून आली. या जीपवर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी ती रोखून झडती घेतली असता जीपमध्ये पांढºया रंगाच्या पोत्यांमध्ये रंगबाज पान मसाला गुटख्याचा मोठा साठा मिळून आला. सुमारे ६ लाख रूपये किंमतीचा हा साठा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी जीपचालक जैद सलाउद्दीन शेख (३३,रा.पाथर्डीफाटा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच ४ लाख रूपयांचे वाहनदेखील जप्त केले आहे. एकूण १० लाख रूपयांचा मुद्देमाल या गुन्ह्यात पोलिसांनी हस्तगत केला असून संशयित शेखविरूध्द अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयfoodअन्नArrestअटक