शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांत सहा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:45 IST

नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत सहाजण ठार झाले, तर सातजण जखमी झाले. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत अपघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे़त. पिंपळगाव बसवंत : मुंबई- आग्रा महामार्गावरील पिंपळगाव (बसवंत) लगतच्या शिरवाडे फाट्याजवळ झालेल्या विचित्र अपघातात दोनजण ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.२०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.शिरवाडे फाट्याजवळ ...

ठळक मुद्देया प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत अपघाताचे गुन्हे दाखल सातजण जखमी झाले

नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत सहाजण ठार झाले, तर सातजण जखमी झाले. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत अपघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे़त. पिंपळगाव बसवंत : मुंबई- आग्रा महामार्गावरील पिंपळगाव (बसवंत) लगतच्या शिरवाडे फाट्याजवळ झालेल्या विचित्र अपघातात दोनजण ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.२०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.शिरवाडे फाट्याजवळ मोटरसायकलने (क्र . एमएच १५- ७२१६) बापूसाहेब काशीनाथ भोसले (५०, रा. सारोळे) हे जात होते. मागून भरधाव येणाऱ्या महेंद्रा कंपनीच्या चारचाकी गाडीने (क्र. एमएच १२ - ३१०४) दुचाकीला धडक दिल्याने बापुसाहेब भोसले हे जागीच ठार झाले. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जवळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या योगेश केदू काळे (३०) यांच्या दुचाकीला (क्र. एम. एच. १५- १७५१) जोरदार धडक दिली यात काळे यांचा जागेवरच मृत्यू झाला. या विचित्र अपघातात दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे - नाशिक-पुणे महामार्गावरील नांदूरशिंगोटे बायपासजवळ ट्रक, कार व मोटारसायकल यांच्यात मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अपघात होऊन कुंदेवाडी येथील एक ठार, तर तीनजण जखमी झाले. अपघातानंतर अ‍ॅक्टिव्हा या दुचाकीने पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. मंगळवारी (दि. २०) दुपारी १२ वाजेच्या सुमारास नांदूरशिंगोटे शिवारातील नाशिक- पुणे बायपासवर नाशिककडून संगमनेरकडे जाणारी मालवाहू ट्रक (क्र. एमएच १७ बीडी ७४७४) ने पुढे चालणाºया कारला (क्र. एमएच ०१ बीव्ही ६२७२) व मोटारसायकलला (क्र. एमएच १५ डीएफ ५३८६) जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल चालक नंदू किसन गाडेकर (३५), रा. कुंदेवाडी ता. सिन्नर हे जागीच गतप्राण झाले, तर त्यांची पुतणी वैशाली देवराम गाडेकर यांच्यासह तीन जण जखमी झाले. दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा असल्याने अपघातानंतर त्यांच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. त्यात दुचाकी जळून खाक झाली. वावी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदवड : तालुक्यातील आडगाव टप्पानजीक हॉटेल स्वागतसमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक ठार झाला. मंगळवारी (दि. २०) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मंगळवारी दुपारी एका गिºहाइकाने हॉटेल स्वागतचे कॅशिअर अरीफ अब्दुला मैसालिया, मूळ रा. गुजरात यांना येऊन सांगितले की, हॉटेलसमोरच्या मैदानावर एक इसम मृतावस्थेत आढळून आला. मैसालिया यांनी चांदवड पोलिसांना कळविले असता, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. पंचनामा करून मृतदेह चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणला. मृतकाच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीवरून त्याचे नाव संतोष चंद्रभान काटे (२८), रा. तळवाडे असल्याचे समजले. वाहनाने धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.मनमाड रोडवर दुचाकींची धडकचांदवड : मनमाड रोडवर कोतवाल पेट्रोलपंपाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना दि. १९ फेब्रुवारी रोजी घडली होती. विशाल संतोष अहिरे (१८, रा. बांधगाव), सतीश हिरामण पवार (१५) व सुनील राजेंद्र पवार (१८, दोघे रा. धोडंबे) हे तिघे बजाज प्लॅटिना या दुचाकीने (क्र. एमएच ४१ एएच ९८१३) मनमाड रोडने जात होते. कोतवाल पेट्रोलपंपजवळ त्यांच्या गाडीला अज्ञात दुचाकीने जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेही जबर जखमी झाले. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यापैकी विशाल संतोष अहिरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. जखमींवर उपचार सुरू असल्याने सदरचा गुन्हा उशिराने दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.भरवस फाटा रोडवर एक ठारलासलगाव : भरवस फाटा रोडवर झालेल्या तिहेरी अपघातात डोंगरगाव येथील किरण सोनवणे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. भरवस फाटा रस्त्यावरील निमगाव वाकडा - मरळगोईदरम्यान गायकर वस्तीजवळ मरळगोई येथे नातेवाइकाकडे जात असताना समोरून येणाºया ट्रक (एमएच १८ के.१८८) व मोटार सायकल (क्र. एमएच ३१ बीएल ८६१८) यांच्या अपघातात झाला. यात किरण सूर्यभान सोनवणे (२८) जागीच ठार झाले, तर अजय बर्डे, रा. डोंगरगांव व विजय अंकुळनेकर, रा.शिरसगाव लौकी हे गंभीर जखमी झाले. जखमींना निफाड रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.