शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकरा महिन्यांत सहा बिबटे अपघातांत ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:17 IST

राष्टÑीय-राज्य महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून रस्ता ओलांडताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा गेल्या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणाºया बिबट्यासारख्या चपळ वन्यप्राण्यालाही महामार्गावरील अमर्यादपणे धावणाºया वाहनांपुढे जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस सदर समस्या गंभीर रूप धारण करत असून, ही धक्कादायक बाब आहे.

अझहर शेख ।नाशिक : राष्टÑीय-राज्य महामार्गांलगत असलेल्या वनक्षेत्रातून भरकटून रस्ता ओलांडताना नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत एकूण सहा बिबट्यांचा गेल्या अकरा महिन्यांत अपघाती मृत्यू झाला आहे. अवघ्या तासाभरात कित्येक किलोमीटर अंतर कापणाºया बिबट्यासारख्या चपळ वन्यप्राण्यालाही महामार्गावरील अमर्यादपणे धावणाºया वाहनांपुढे जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस सदर समस्या गंभीर रूप धारण करत असून, ही धक्कादायक बाब आहे.  जिल्ह्यातील निफाड, इगतपुरी, दिंडोरी, बागलाण, सटाणा, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील परिसरात बिबट्याचा अधिवास आढळतो. त्यामुळे या भागात मानव-बिबट्याचा संघर्षही पहावयास मिळतो. पुरेसे भक्ष्य ऊसशेतीमध्ये किंवा परिसरातील विरळ झालेल्या वनक्षेत्रात न मिळाल्यामुळे मानवी वस्तीकडे भरकटणारा बिबट्या कधी शेतकºयांच्या पशुधनावर तर कधी लहान मुलांवर हल्ले करत असल्याच्या अनेक घटना या भागामध्ये घडल्या आहेत. दरम्यान, या तालुक्यांमधून जाणारे राज्य व राष्टÑीय महामार्ग ओलांडताना बिबट्यांना जीव गमवावा लागत आहे. महामार्गावरून धावणाºया वाहनांमुळे रस्ता ओलांडताना बिबटे गतप्राण होत आहेत. बिबट्यांसारख्या अन्य वन्यजिवांचाही महामार्गांलगतच्या वनक्षेत्रात असलेला वावर लक्षात घेत त्या वनपरिक्षेत्रांच्या हद्दीत संबंधित वनविभागाने ‘वन्यजिवांचा वावर, वाहने सावकाश चालवा’ असे आवाहन वजा सूचना करणारे फलकही लावले आहेत; मात्र वाहनचालक याकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात वाहने चालविणे पसंत करतात. त्यामुळे अचानकपणे संध्याकाळनंतर भक्ष्याच्या शोधात भटकं ती करणाºया बिबट्यासारख्या वन्यजिवांना आपले प्राण वाहनांच्या धडकेत गमवावे लागत आहे. वेग मर्यादेत असल्यास अचानकपणे बिबट्यासारखे वन्यजीव रस्ता ओलांडताना समोर आल्यास वाहन नियंत्रीत करणे शक्य होऊन अपघात टाळता येऊ शकतो; मात्र जर अमर्याद वेगाने वाहन धावत असेल तर मात्र अपघात टाळणे वाहनचालकांना शक्य होत नाही. अस्तित्वालाच धोका ! उसाच्या क्षेत्रात किंवा अन्य शेतीच्या क्षेत्रात व मोकळ्या भूखंडावर भक्ष्याचा पाठलाग करताना अनेकदा बिबट्याची वाट चुकते आणि संरक्षक कठडे नसलेल्या जमिनीला समांतर असलेल्या विहिरींमध्ये बिबट्या पडतो आणि सुरू होतो त्याच्या जीवन-मरणाचा संघर्ष! बिबट्याच्या जिवावर बेतणारी ही समस्या सुटत नाही तोच पुन्हा माणसाने स्वत:च्या सोईसाठी विकसित केलेल्या अत्यंत गुळगुळीत अशा डांबरीकरणाच्या रुंद महामार्गांवरही बिबट्या ठार होऊ लागला आहे. यामुळे बिबट्याचे अस्तित्वच जणू धोक्यात आले आहे. महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. येथे पडले बिबटे मृत्युमुखी नाशिक-मुंबई महामार्गावरील पाडळी, विल्होळी शिवारात प्रत्येकी एक पुणे महामार्ग सिन्नर वनपरिक्षेत्रात दोन सिन्नर-घोटी राज्य मार्गावर एक मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड शिवारात एक असे सहा बिबटे अपघातात मृत्युमुखी पडले.

टॅग्स :TigerवाघAccidentअपघात