येवला : तालुक्यातील नगरसूल येथे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दि. २४ ते दि. २९ मार्च असा सहा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे.वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नगरसूल येथे पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी भेट देऊन पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी तालुकास्तरावर आढावा घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांशी संवाद साधून बुधवार (दि. ४) ते सोमवार (दि.२९) पावेतो जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरसूलला सहा दिवस जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:51 IST