शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहा नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर

By admin | Updated: January 30, 2017 00:31 IST

सहा नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर

नाशिकरोड : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार निवडीसाठी ठरवलेल्या कोर कमिटी सदस्यांचा अहवाल संपर्क प्रमुखाकडे सादर करण्यात आल्याने पक्षप्रमुख व इतर वरिष्ठ नेते त्यावर विचार करून बुधवारनंतरच शिवसेनेची उमेदवारांची घोषणा होणार आहे. कोर कमिटीच्या सदस्यांनी दिलेल्या अहवालामुळे वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मनपाच्या निवडणुकीच्या निमित्ताने संपर्कप्रमुख अजय चौधरी, उपनेते बबन घोलप, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, आमदार योगेश घोलप, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, नगरसेवक अ‍ॅड. शिवाजी सहाणे, सुधाकर बडगुजर, राजू लवटे यांची मनपा निवडणूक उमेदवार ठरवण्यासाठी विभागनिहाय कोर कमिटी स्थापन करण्यात आली होती, यातील काही पदाधिकाऱ्यांना संपूर्ण ३१ प्रभागांचा अहवाल देण्यास सांगितला होता. त्यामध्ये सर्वांचे अहवाल संपर्कप्रमुख अजय चौधरी यांच्याकडे सुपूर्द झाले आहेत. अजय चौधरी हे स्वत:चा व या सर्वांचा अहवाल शिवसेनचे सचिव अनिल देसाई यांच्याकडे देणार आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वरिष्ठ नेते व स्थानिक कोर कमिटी सदस्यांची सोमवारी किंवा मंगळवारी बैठक घेऊन उमेदवारी निश्चत करणार असल्याचे समजते. कोर कमिटीच्या सदस्यांनी ज्याला ए प्लस व ए असे काम दिले असतील त्या उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या नावांवर तिढा निर्माण होईल ती यादी शुक्रवारी प्रसिद्ध केली जाणार आहे.