शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सहा विभागांत ‘देवराई’च्या जागा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:48 IST

शहरातील वनीकरण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने देवराईसाठी सहा विभागांतील जागांची प्राथमिक स्तरावर निवड केली असून, विविध पर्यावरण प्रेमींनी दहा वर्षांसाठी त्यांचे दायित्वदेखील स्वीकारले आहे. आता लवकरच याठिकाणी देशी प्रजातीच्या झाडांचे आॅक्सिजन हब उभे राहणार आहे.

नाशिक : शहरातील वनीकरण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने देवराईसाठी सहा विभागांतील जागांची प्राथमिक स्तरावर निवड केली असून, विविध पर्यावरण प्रेमींनी दहा वर्षांसाठी त्यांचे दायित्वदेखील स्वीकारले आहे. आता लवकरच याठिकाणी देशी प्रजातीच्या झाडांचे आॅक्सिजन हब उभे राहणार आहे.शहरातील हवा प्रदूषित होत असते. त्या पार्श्वभूमीवर मनपाच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. परंतु त्यात पुरेसे नियोजन नसते. यासंदर्भात यंदा मात्र महापालिकेच्या उद्यान विभागाने विशेष नियोजन केले असून, शहरातील सहाही विभागांत आॅक्सिजन हब उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सामान्यत: ग्रामीण भागात आध्यात्मिक महत्त्व असलेल्या देवराईच्या धर्तीवर नाशिक शहरात उद्यान विभाग ब्लॉक प्लॅँटेशन करून देवराई फुलवणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध जागांची तपासणी केली होती. त्यानंतर आता नाशिक पश्चिम विभागात गायकवाड मळा, पूर्व नाशिकमध्ये उपनगर येथील मातोश्रीनगर, नाशिकरोड येथील इंगळेनगर, पंचवटीत तांबोळीनगर आणि सातपूर विभागात संभाजी व्यायामशाळा परिसराची निवड करण्यात आली आहे. सिडको विभागातील दोन जागा प्रस्तावित असून, त्यासंदर्भात मात्र जागेची अंतिम निवड होणे बाकी आहे.शहरातील विविध सेवाभावी पर्यावरण क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या संस्थांची यासंदर्भात बैठक सोमवारी (दि. २१) आयोजित करण्यात आली होती. उपआयुक्त शिवाजी आमले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अनेक संस्थांनी सहभाग घेतला होता. या संस्थांना देवराईच्या दहा वर्षे संवर्धनासाठी या सेवाभावी संस्थांकडे जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सातपूर विभागात पतंजली, पश्चिम नाशिक विभागात सिलीकॉन व्हॅली, पूर्व नाशिक विभागात ग्रीन रेव्हल्युशन, नाशिकरोड आणि पंचवटी विभागात आर्ट आॅफ लिव्हिंगने जबाबदारी घेतली आहे. सिडकोतील जागा निश्चितीनंतर तेथील सेवाभावी संस्थेचीदेखील जागा निश्चित केली जाणार आहे.सदरच्या जागेत देशी प्रजातीची झाडे लावून शहरात प्राणवायू वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, त्यात सेवाभावी संस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिक