शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावातील गोळीबार प्रकरणातील सहा आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 00:45 IST

मालेगाव मध्य : गेल्या ८जुलै रोजीकल्याणला शेळ्या विकण्यासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे व्यापारी अलीम सलीम खाटीक यांच्या पिकअपवर गोळीबार करणाऱ्या ६ जणांना पोलिसानी ताब्यात घेतले असून त्यांचे विरोधात पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपवारवाड़ी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मालेगाव मध्य : गेल्या ८जुलै रोजीकल्याणला शेळ्या विकण्यासाठी जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे व्यापारी अलीम सलीम खाटीक यांच्या पिकअपवर गोळीबार करणाऱ्या ६ जणांना पोलिसानी ताब्यात घेतले असून त्यांचे विरोधात पवारवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्यापारी अलीम खाटीक हे आपल्या नातेवाईकांसह त्यांचेकडील पिकअप वाहन क्र.. एम. एच. ४८. ए. जी. ८७६१ या वाहनात बकरीईद निमित्ताने कल्याण येथे बकरे विक्री करण्यासाठी घेऊन जात असतांना, पहाटेचे सुमारास तालुक्यातील पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावर दरेगाव शिवारात, जनता सायजिंग जवळ मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात तीन इसमांनी पिकअप गाडी यांबविण्यास सांगितले.

पिकअप गाडीवरील चालक नितेश निकम व अलीम खाटीक यांना संशय आल्याने त्यांनी गाड़ी यांबविली नाही म्हणुन मोटर सायकलवरील तीन इसमांपैकी मध्ये बसलेल्या इसमाने चालु गाडीवर बंदुकीतुन गोळी झाडली. गोळी पिकअपच्या केबीनमध्ये बसलेल्या जावेद रज्जाक खाटीक यांचे डोक्याचे डावे बाजुस लागुन से गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. घटनेबाबत फिर्यादी अलीम सलीम खाटीक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवारवाड़ी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनेतील जखमी झालेले जावेद रज्जाक खाटीक हे उपचारादरम्यान मयत झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेबाबत पोलीस अधीक्षक श सचिन पाटील यांनी तात्काळ दखल घेवुन सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी मालेगाव सह नजीकचे जिल्हयात तपास पथके रवाना केली. तसेच सदर गुन्हयातील आरोपीचे गुन्हा करण्याचे पध्दतीवरुन गुप्त माहिती घेवुन संशयीत हासिम पिंजारी उर्फ पापा गोल्डन, रा. दरेगाव शिवार, मालेगाव, गोपाल गिरासे, रा. साकीरोड, धुळे, सैय्यद अबुजर, रा. नयापुरा, मालेगाव मकसुद अहमद उर्फ मत्से, रा. रहेमानपुरा, मालेगाव, मोहमद साजिद उर्फ मिर्ची, रा. रजापुरा, मालेगाव, मोहमद अकम उर्फ मंथन चोरवा, रा. गोल्डननगर, मालेगाव यांना ताब्यात घेण्यात आले. "त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी गुन्हयात वापरलेली मोटर सायकल मिळुन आली. गुन्हयात वापरलेले अग्निशस्त्रावे (बंदुक) तुकडे करून नदीत फेकले असल्याचे कबुल केले. त्या ठिकाणावरून अग्निशस्त्र (बंदुक) चे तुकडे जप्त करण्यात आले आहे. यातील आरोपीना वरील गुन्हयात अटक करण्यात आली. पुढील तपास पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत भोये यांचे पथक करीत आहे.पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत भोये, हवालदार सचिन धारणकर, पोना भरत गांगुर्डे, विनायक जगताप, पोलीस कर्मचारी नवनाथ शेलार, सचिन भामरे, अंबादास डामसे, राकेश जाधव यांचे पथकाने गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेवुन गुन्हा उघडकीस आणला आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी