ओझर-येथील सुकेणे रोडवरील चारणबाबा मळा येथे ओम चैतन्य शिवगोरक्षनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न झाले. सकाळी साडे नऊ वाजता बाजारपेठ येथुन मिरवणुकीस प्रारंभ झाला. बस स्टँड,जुनी पाण्याची टाकी, भगवा चौक, तांबट लेन मेनरोड, शिवाजी रोड, राजवाड्या मार्गे चारणबाबा मळा येथे बांधण्यात आलेल्या मंदिरात मंत्रोच्चारच्या निनादात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी अलख निरंजनच्या जयघोष करण्यात आला. सायंकाळी महाप्रसाद देण्यात आला.यावेळी नाथ भक्त व गावातील भाविक उपस्थित होते.
शिवगोरक्षनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 14:44 IST