शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ सीटूतर्फे निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 00:50 IST

इगतपुरी : रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात इगतपुरीत सीटूच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत स्थानकासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने १०९ रेल्वे मार्गावर १५१ खासगी रेल्वे गाड्या चालविण्यासाठी देशी-विदेशी खासगी कंपन्यांना निमंत्रित केले आहे.

इगतपुरी : रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात इगतपुरीत सीटूच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत स्थानकासमोर निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने १०९ रेल्वे मार्गावर १५१ खासगी रेल्वे गाड्या चालविण्यासाठी देशी-विदेशी खासगी कंपन्यांना निमंत्रित केले आहे. यापूर्वी सरकारने रेल्वे इंजिन व बोगिचे उत्पादन, इलेक्ट्रिकल आणि सिग्नलचे काम व मालवाहतूक मार्ग यामध्ये १०० टक्के परकीय गुंतवणुकीला मुभा दिली आहे. सरकार ४०० रेल्वे स्टेशनचे खासगीकरण करणार आहे. रेल्वेचे खासगीकरण रद्द करा, क व ड वर्गातील पदे रिक्त करण्याचा निर्णय मागे घ्या,१ लाख २५ हजार रिक्त पदे तातडीने भरा आदींसह विविध मागण्यांचे निवेदन इगतपुरीचे स्टेशन प्रबंधक यांना देण्यात आले. सीटूचे नाशिक जिल्हा सरचिटणीस कॉ. देविदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी कॉ. कांतीलाल गरु ड, कॉ. निवृत्ती कडू, कॉ. चंद्रकांत लाखे, कॉ. मच्छिंद्र गतीर, कॉ. दत्ता राक्षे, कॉ. विश्वास दुभाषे, कॉ. प्रभाकर नाठे आदी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.----------------------मनमाडला निदर्शनेमनमाड : सरकारने भारतीय रेल्वे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून देशातील रेल्वेगाड्या खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी देश-विदेशातील कंपन्यांनानिमंत्रित केले आहे. याविरोधात मनमाड येथे विविध कामगार संघटनाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकार भारतीय रेल्वे विकण्याचा घाट घालत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांसह सामान्य जनतेलाही याचा मोठा फटका बसणार आहे. या विरोधात सिटू संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू केले आहे.मनमाड शहरातही नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या सदस्यांनीही पाठिंबा देत सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला. यावेळी युनियनचे कॉ. अंबादास निकम, सबरीश नायर, हेमंत डोंगरे, सुनील गडवे, किरण कातकडे, मिलिंद लिहणार, प्रवीण बागुल, रमेश केदारे, सुरेश पगारे, सचिन काकड, नवनाथ आव्हाड तर सिटू संघटनेचे रामदास पगारे, तुकाराम सोनजे, जॉर्ज जॉनी, किशोर आहिरे आदी उपस्थित होते. रेल्वे प्रशासनाला आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक