शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला सहायक निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2022 00:23 IST

निफाड : तालुक्यात नवीन स्थापन झालेल्या सात संस्थांचे पदाधिकारी व सभासदांची नावे जुन्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मतदार यादीत आल्याने सदर दुबार नावे तातडीने कमी करावी, या मागणीसाठी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसैनिकांसह निफाडच्या सहायक निबंधकांना घेराव घालत कार्यालयातच शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना घेराव : माजी आमदार अनिल कदम यांच्यासह शिवसैनिक आक्रमक

निफाड : तालुक्यात नवीन स्थापन झालेल्या सात संस्थांचे पदाधिकारी व सभासदांची नावे जुन्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मतदार यादीत आल्याने सदर दुबार नावे तातडीने कमी करावी, या मागणीसाठी निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसैनिकांसह निफाडच्या सहायक निबंधकांना घेराव घालत कार्यालयातच शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले.पिंपळगाव बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सहकारी सोसायटी निवडणुकांमध्ये आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नवीन स्थापन झालेल्या सात विविध कार्यकारी सोसायटी संस्थांचे पदाधिकारी व सभासदांची नावे जुन्या विविध कार्यकारी संस्थेच्या मतदार यादीत आल्याने हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. निफाड तालुक्यात नवीन स्थापन झालेल्या सात संस्थाचे पदाधिकारी व सभासदांची नावे जुन्या विविध कार्यकारी सोसायट्यांच्या मतदार यादीत आल्याने माजी सभापती पंडित आहेर, तालुकाप्रमुख सुधीर कराड, खंडू बोडके-पाटील यांनी हरकती घेऊनही निबंधक रणजीत पाटील यांनी याप्रश्नी निर्णय न दिल्याने सदर दुबार नावे तातडीने कमी करावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सहायक निबंधक रणजीत पाटील त्यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन करण्यात आले.याप्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशपत्राबाबत कार्यवाही न केल्याबद्दल माजी आमदार अनिल कदम यांनी आक्रमक पवित्रा घेत सहायक निबंधक रणजीत पाटील यांना जाब विचारत फैलावर घेतले. तब्बल पाच तास शिवसैनिकांनी निबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन करत निबंधक रणजीत पाटील यांना घेराव घातला. याबाबत रणजीत पाटील यांनी तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर घेराव आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.यावेळी विक्रम रंधवे, सुधीर कराड, गोकुळ गिते, सचिन वाघ, शरद नाठे, दादासाहेब बोरगुडे, बापू बोरगुडे, संजय बोरगुडे, मोहन जगताप, खंडू बोडके पाटील, शहाजी राजोळे, शंकर संगमनेरे, दीपक कुशारे, छोटू साळे, अरुण डांगळे, भारत जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, प्रवीण जगताप, शंकर दौड, किरण दौंड, लक्ष्मण चकोर, संतोष टरले, ओम टरले, साईनाथ काळे उपस्थित होते.

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारण