शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला विठ्ठलमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST

कलशारोहण : पांडुरंगाच्या मूर्तीची शोभायात्रा सिन्नर : शहराच्या विजयनगर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वारकरी भवन येथील मंदिरातील श्री विठ्ठलमूर्ती ...

कलशारोहण : पांडुरंगाच्या मूर्तीची शोभायात्रा

सिन्नर : शहराच्या विजयनगर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वारकरी भवन येथील मंदिरातील श्री विठ्ठलमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. बुधवारी सकाळी ९ वाजता हभप रामराव महाराज ढोक यांच्या हस्ते, तर कलशारोहण न्यायवेदांताचार्य श्री स्वामी देवानंद गिरीजी महाराज, महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते पार पडला. यानिमित्त सोमवारपासून तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विठ्ठल मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कीर्तन सोहळा व महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. सोमवारी अभिषेक महापूजा करण्यात आली. मंगळवारी सकाळी अभिषेक महापूजा, तसेच ९ वाजता भगवान पांडुरंगाच्या मूर्तीची मिरवणूक व शोभायात्रा काढण्यात आली. बुुधवारी सकाळी ९ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, सकाळी १० वाजता रामराव महाराज ढोक यांच्या रसाळ सुमधुर वाणीतून कीर्तन सोहळा व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल मंदिर सेवा समिती, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष कैलास महाराज तांबे व वारकरी यांनी परिश्रम घेतले.

-----------------

पावणेदोन एकर जागेवर वारकरी भवन

भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक व्यासंग करू इच्छिणाऱ्यांसाठी सिन्नरमध्ये पावणेदोन एकर जागेवर सुमारे एक कोटी एक लाख रुपये खर्चून प्रशस्त वारकरी भवन उभारण्यात आले आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पुढाकाराने सिन्नर नगर परिषदेचे योगदान, तसेच माजी आमदार रामहरी रूपनवर व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या आमदार निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये मदतीतून वारकरी भवन साकारले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले असून त्यांचा अर्धाकृती पुतळाही सभागृहात उभारला आहे.

------------------

पंढरपूरच्या मूर्तीशी साम्य

११६ फूट लांब व ४० फूट रुंद आकाराच्या सभागृहात अडीच हजार श्रोत्यांच्या बैठकीची क्षमता आहे. पश्चिम बाजूस ३९ बाय २९ फूट आकाराचे मंदिर उभारण्यात आले आहे. १० बाय १० आकाराच्या गाभाऱ्यातील ४७ इंच उंचीची पंढरपूर येथील विठ्ठलमूर्तीशी साम्य असलेली एकशे एक किलो वजनाची गन मेटलमधील विठ्ठलमूर्ती साकारली आहे.

--------------------

सिन्नर येथे विठ्ठलमूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाप्रसंगी हभप रामराव महाराज ढोक, माजी आमदार राजाभाऊ वाजे, श्री स्वामी देवानंद गिरीजी महाराज, महामंडलेश्वर सोमेश्वरानंद महाराज, हभप कैलास महाराज तांबे यांच्यासह भाविक.

(०१ सिन्नर १)

010921\01nsk_14_01092021_13.jpg

०१ सिन्नर १