शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरकरांचा तीन दिवस लॉकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 21:57 IST

दोन्ही भाजीबाजारात शुकशुकाट

ठळक मुद्देदवाखाने व औषधविक्रीची दुकाने सोडून शहरातील सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेत त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे

सिन्नर : शासनाने सोमवारपासून संचारबंदीत काहीशी शिथिलता जाहीर केल्याचा फायदा घेऊन गर्दी होऊ नये यासाठी सोमवारपासून शहरात तीन दिवस कडक लॉकडाउन पाळण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.सुरुवातीला नगराध्यक्ष किरण डगळे यांचे आवाहनाचे पत्र विविध व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकण्यात आले होते. मात्र, त्यानंतर प्रशासनाने खंबीर भूमिका घेत लॉकडाउन कडक करण्याचा कालावधी ३ दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून (दि.२०) नगर परिषदेच्या वतीने सकाळी ६ वाजेपासून शहराच्या विविध भागात रिक्षाद्वारे ध्वनिक्षेपकावरून लॉकडाउनची माहती देण्यात येत होती. शेती व उद्योगांसाठी शासनाने उत्पादन करण्यास परवानगी दिली आहे. त्याचा गैर अर्थ लावून रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून नगराध्यक्ष डगळे यांच्या नावे आवाहन करणारे पत्र व्हायरल झाले. त्यातून थोडेसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. सकाळी आडव्या फाट्यावर भाजीबाजार भरला होता. मात्र, त्यानंतर सर्वांना दुकाने बंद करून घरी पाठवण्यात आले. बाजार समितीतील भाजी बाजारातही शेतकऱ्यांसह कुणालाही बसू देण्यात आले नाही. त्यामुळे या दोन्ही भाजीबाजारात शुकशुकाट दिसत होता. शहारातील सर्व किराणा दुकानेही बंद करण्यात आली. सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तहसीलदार राहुल कोताडे, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. बसस्थानकासह शहराच्या विविध भागात थांबून रस्त्याने येणा-या-जाणा-या वाहनांची त्यांच्याकडून तपासणी करण्यात येत होती. बाजार समितीत कांदा व धान्याचे लिलाव सुरू होते. दवाखाने व औषधविक्रीची दुकाने सोडून शहरातील सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेत त्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक