शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बस बायपासहून परस्पर जात असल्याने सिन्नरकरांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:46 IST

सिन्नर : नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसेस स्थानकात न येता परस्पर सिन्नर वळण रस्त्यावरूनच निघून जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

सिन्नर : नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसेस स्थानकात न येता परस्पर सिन्नर वळण रस्त्यावरूनच निघून जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.राज्य परिवहन महामंडळ सिन्नरकरांना किती दिवस सापत्नपणाची वागणूक देणार असा प्रश्न प्रवाशी करत असून रिकाम्या धावणाºया शिवशाही बसेस सिन्नरच्या बसस्थानकात आल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.एस. टी. महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही बसेस अनेकदा रिकाम्याच धावतात. पुरसे प्रवासी नसतील तर नाशिकरोड बसस्थानकावर अर्धा-अर्धा तास प्रवाशांची वाट पहात उभ्या राहतात. तरीही प्रवासी मिळाले नाही तर अर्ध्या रिकाम्याच सिन्नरच्या बाहेरून निघून जातात. नाशिकहून सिन्नरला जाण्यासाठी या बसेसमध्ये जायचे असल्यास या बसेसला सिन्नरसाठी थांबा नसल्याचे कारण सांगितले जाते. रिकाम्या बस पळवून महामंडळाचे आर्थिक नुकसान होत असल्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्यात येत असल्याबद्दल सिन्नरच्या प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.अनेक सिन्नरकर नोकरीनिमित्त पुण्यात राहतात. आठवड्यातून एकदा ते सिन्नरला येतात. शिवाशाही बसेस गावाच्या बाहेरच उतरवून निघुन जात असल्याने शिवशाहीचे प्रवास करण्याचे त्यांच्याकडून टाळले जात आहे. शहरातील अनेक व्यावसाईक, दोन्ही औद्योगिक वसाहतीतील अधिकारी विविध कारणांसाठी पुण्याला जात असतात. मात्र, शिवशाहीची व्यवस्थाच नसल्याने खासगी आराम बसेसचा आधार घ्यावा लागतोे.

टॅग्स :Bus Driverबसचालक