शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा सिन्नरला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 18:01 IST

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सकल धनगर समाज कृती समितीच्यावतीने सिन्नर तहसील कार्यालयावर सोमवार (दि. २७) रोजी सकाळी ९ वाजता शेळ्या-मेंढ्यासह धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने सकल धनगर समाज कृती समितीच्यावतीने सिन्नर तहसील कार्यालयावर सोमवार (दि. २७) रोजी सकाळी ९ वाजता शेळ्या-मेंढ्यासह धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.धनगर समाजाला अनुसूचित जमाती ( एस.टी.) प्रवर्गाच्या सवलती शासनाने तत्काळ लागू कराव्यात, समाजाला घटनेत नमूद केलेल्या अनुसुचीत जमातीच्या केंद्र शासनाच्या यादीत क्रमांक ३६ मध्ये सवलती लागू केलेल्या आहेत. त्या सवलती महाराष्ट्र शासनाने त्वरीत लागू कराव्या अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. धनगर समाजाची शासनाने फसवणूक केली असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. त्यामुळे या समाजाचे शैक्षणिक, नोकरीत मोठे नुकसान झाले आहे. लोकसभा व राज्यसभेत अनेकवेळा आवाज उठवूनही आरक्षणावर आजपर्यंत कोणताही तोडगा काढला नाही. मुळात धनगड व धनगर हे समाज एकच असून केवळ अपभ्रंश करून शासन समाजाला वेठीस धरत असल्याचा आरोप केला जात आहे. झारखंड, तामिळनाडू, ओडीसा, उत्तरप्रदेश आदी राज्यात हा समाज अनुसूचित जमातीतआहे.परंतु महाराष्ट्रात हा समाज भटक्या जातीत गणला गेला आहे. धनगर समाज हा मुळातच पशुपालक असून भटकंती करणारा समाज आहे. या समाजाला त्वरित आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारला जाग आणण्यासाठी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.सोमवारी सकाळी ९ वाजता आडवा फाटा (हुतात्मा स्मारक) येथून मोर्चास प्रारंभ होणार असून यावेळी धनगर समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Strikeसंप