शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 21:39 IST

सिन्नर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या आदेशाने भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रांताधिकाऱ्यांचे आदेश : विशेष पथकाची देखरेख

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार राहुल कोताडे यांच्या आदेशाने भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे.तहसील कार्यालयात पथक सिन्नर शहर व तालुक्यात तपासणी करणार असून, कोविड-१९ संदर्भात जिल्हाधिकाºयांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाºया दुकाने, खासगी आस्थापनेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी, तलाठी यांचा या पथकात समावेश असून, आपापल्या कार्यक्षेत्रात ही पथके प्रांताधिकारी यांच्या आदेशाने कोरोनासंदर्भातील उपाययोजनांवर देखरेख ठेवणार आहे. या पथकाने मंगळवारी (दि. २३) सिन्नर शहरात विविध भागात तपासणी केली असून, फिजिकल डिस्टन्सिंगचा अभाव, मास्क न वापरता ग्राहकांना सेवा देणे, नियमापेक्षा अधिक कर्मचारी, दुकानातील अनियंत्रित गर्दी याबाबत काही दुकानदारांना नोटिसा बजावल्या आहेत.दरम्यान, हे भरारी पथक तालुक्यात तपासणी करून नियमांचे उल्लंघन करताना दिसून आल्यास दुकाने सील करण्याची कारवाई करणार आहे. पार्सल सेवेच्या नावाखाली सुरू केलेल्या हॉटेल्सची-देखील पथकाने तपासणी केली असता तिथेदेखील शासन निर्देशांचे पालन होत नसल्याचे आढळून आले, मात्र पहिल्या खेपेला लेखी समज देण्यात येत असून, दुसºया वेळी मात्र थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पथकाचे प्रमुख मरकड यांनी सांगितले. नगरपालिकेतर्फे दुकानदारांना नोटिसागणेशपेठ या गजबजलेल्या भागात असणाºया दुकानांची तलाठी आकाश हांडे यांच्या समवेत या पथकाने तपासणी केली असता दुकानात खरेदीसाठी अधिक गर्दी आढळून आली. याबाबत काही दुकानदारांना नोटिसा देण्यात आल्या. यात बहुतांश कापड दुकानांचा समावेश आहे. पुन्हा हीच परिस्थिती आढळल्यास दुकान सील केले जाईल, असे या नोटिसीत म्हटले आहे. मुख्याधिकाºयांनी संबंधित दुकानांची दररोज तपासणी करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसून आल्यास कायदेशीर फिर्याद दाखल करावी, असे निर्देशदेखील विशेष भरारी पथकाकडून देण्यात आले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या