शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला दोन टप्प्यात २८०० जणांनी घेतली कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 00:38 IST

सिन्नर : सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या दोन टप्प्यात २८०० जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतले आहे तर मंगळवारपासून (दि. २) कोविड-१९ लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसात २५० ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचून घेतली. विशेष म्हणजे लस टोचून घेतलेल्या नागरिकांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे.

ठळक मुद्दे लसीकरण: दुसऱ्या टप्यात २५० ज्येष्ठांचा सहभाग

वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, नोडल अधिकारी डॉ. वैभव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लसीकरण अधिकारी संगीता शिंदे, जयश्री लांडगे, अमोल ह्याळीज, वॅक्सिनेटर दीपाली केदार यांनी नागरिकांना लस दिली. कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात सुमारे २५५० कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस, प्रशासन व इतर कोरोना योद्ध्यांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात सामान्य व्यक्तींनाही कोरोना लस घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना को-विन या मोबाईल अ‍ॅप्लिकेशन किंवा वेबसाईटवर नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.अ‍ॅप्लिकेशनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने लसीकरण मोहिमेत अडथळा येत आहे. मात्र नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासगी सेंटर सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून खासगी दवाखान्यातही लसीकरण सुरू होऊ शकते. तसे झाल्यास सरकारी यंत्रणेवरील ताण कमी होईल. २५ जानेवारीपासून कोरोना योद्ध्यांसह ज्येष्ठ व व्याधीग्रस्त अशा जवळपास २८०० नागरिकांनी लस टोचून घेतल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.

टॅग्स :NashikनाशिकCorona vaccineकोरोनाची लस