शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

सिन्नरला पाच बसेसमधून ११० परप्रांतीय गावाकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:46 IST

सिन्नर : लॉकडाऊनमुळे सिन्नरमध्ये अडकून पडलेल्या ११० परप्रांतीय कामगारांना सिन्नर बसस्थानकातून पाच बसद्वारे त्यांच्या राज्याकडे मार्गस्थ करण्यात आले.

सिन्नर : लॉकडाऊनमुळे सिन्नरमध्ये अडकून पडलेल्या ११० परप्रांतीय कामगारांना सिन्नर बसस्थानकातून पाच बसद्वारे त्यांच्या राज्याकडे मार्गस्थ करण्यात आले.तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.बी. रसेडे, विजय माळी, आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, वाहतूक नियंत्रक प्रमोद घोलप आदींच्या उपस्थितीत या बसेस रवाना झाल्या. लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभर मुसळगाव, माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील कारखाने बंद ठेवण्यात आल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. यातील ११० कामगारांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत जाता यावे यासाठी महसूल प्रशासनाने व्यवस्था केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन बसेस मध्यप्रदेशातील सेंधवा या गावी तर एक बस विजापूरकडे रवाना करण्यात आली. नोंदणी होऊन त्याप्रमाणे परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात येणार आहे. कामगारांना गाडीत बसण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. बच्छाव यांनी सांगितले.----------------१२०० कामगारांची रेल्वेने व्यवस्थामाळेगाव औद्योगिक वसाहत परिसरातील सुमारे १२०० परप्रांतीय मजुरांना आपापल्या मूळगावी पाठविण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ज्यांना ज्यांना गावाकडे परतायचे आहे अशा कामगार, मजुरांची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात येत होती. नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा वाघ यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामगारांची आरोग्य तपासणी केली. सर्व कामगारांची आरोग्य तापसणी झाल्यानंतर त्यांना स्वतंत्र बसने नाशिकरोड येथे रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविण्यात येईल. तेथून विशेष रेल्वेने सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक