शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला दोन ठिकाणी घरफोडीत चार लाखांचा ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 00:37 IST

सिन्नर: शहरातील विजय नगर तसेच मुसळगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील उज्वल नगर या दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 3 लाख 80 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. वर्दळीच्या व मध्यवर्ती भागात भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे एकूण 80 हजारांचा ऐवज चोरून नेला.

सिन्नर: शहरातील विजय नगर तसेच मुसळगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील उज्वल नगर या दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे 3 लाख 80 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली. वर्दळीच्या व मध्यवर्ती भागात भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे.

            विजय नगर परिसरात न्यू सिटी हाईट या अपार्टमेंटमध्ये सोमनाथ आनंदराव कासट (63) हे व्यापारी वास्तव्यास असून काही कामानिमित्त ते बाहेर गेलेले असल्याने घराला कुलूप लावलेले होते. अज्ञात चोरट्यांनी संधी साधत सकाळी 9.30 ते 12.30 वाजे दरम्यान कासट यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यातील 30 हजार रुपये किमतीच्या चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 4 अंगठ्या आणि 50 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 80 हजारांचा ऐवज चोरून नेला.

             कासट यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ करत आहे.                    औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या उज्वल नगर मध्ये राहणारे बिरजू राजाराम पाल (48) यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी सकाळी 7.30 वाजे दरम्यान प्रवेश करत स्क्रू ड्रावरच्या साह्याने कपाट उघडले. या कपाटातून 3 लाख रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे.

 

टॅग्स :sinnar-acसिन्नरCrime Newsगुन्हेगारी