शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:21 IST

सिन्नर : शहरातील शिवाजीनगर भागातील जुन्या पवार शाळेजवळील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ८० हजार रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने मिळून दोन लाख सहा हजारांचा ऐवज लंपास केला.

ठळक मुद्देसिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची फिर्याद दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : शहरातील शिवाजीनगर भागातील जुन्या पवार शाळेजवळील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ८० हजार रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने मिळून दोन लाख सहा हजारांचा ऐवज लंपास केला.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मूळचे तालुक्यातील घोटेवाडी येथील रहिवाशी असलेले श्रीधर सबाजी सरोदे (५०) कुटुंबीयांसह शहरातील शिवाजीनगर येथे जुन्या पवार शाळेजवळ वास्तव्यास असून, घोटेवाडी येथे शेतीच्या कामासाठी नेहमी ये-जा करत असतात. सरोदे कुटुंबीय शेतकामासाठी घराला कुलूप लावून घोटेवाडी येथे गेले होते. रात्री उशीर झाल्याने त्यांनी घोटेवाडी येथील शेतातील घरातच मुक्काम केला. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी सरोदे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले ८० हजार रुपये तसेच ६० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाची सोन्याचे मणीमंगळसूत्र व ओमपान असलेली सोन्याची पोत, ३० हजार रुपये किमतीचा एक तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, १५ हजार रुपये किमतीचे अर्धा तोळ्याचे सोन्याचे डोरले, १५ हजार रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाची सोन्याची नथणी, सहा हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे ओमपान असा दोन लाख सहा हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सकाळी सरोदे यांच्या वरच्या मजल्यावर वास्तव्यास असलेले भाडेकरू वामन सुदाम कातोरे यांनी सरोदे यांना फोन करून घराचे कुलूप तोडलेले असल्याचे सांगितले. सरोदे यांनी लागलीच सिन्नरला धाव घेऊन घरात पाहणी केली असता कपाट उघडे व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी कपाटात पाहिले असता चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्याने सरोदे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची फिर्याद दिली.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी