शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर : उपसभापतिपदी सुधाकर शिंदे यांची वर्णी; दोन्ही निवड बिनविरोध बाजार समितीच्या सभापतिपदी तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:48 IST

सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी गोंदे येथील विनायक चंद्रभान तांबे, तर उपसभापतिपदी सायाळे येथील सुधाकर राधू शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्दे केवळ दोन उमेदवारी अर्ज प्राप्त बिनविरोध निवडीची घोषणा

सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी गोंदे येथील विनायक चंद्रभान तांबे, तर उपसभापतिपदी सायाळे येथील सुधाकर राधू शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार माणिकराव कोकाटे गटाची सत्ता आहे. अडीच वर्षांपूर्वी बाजार समितीच्या सभापतिपदी अरुण वाघ, तर उपसभापतिपदी सोमनाथ भिसे यांची निवड करण्यात आली होती. सहकारी संचालकांना संधी मिळावी यासाठी वाघ व भिसे यांनी अनुक्रमे सभापती व उपसभापतिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे नूतन सभापती व उपसभापती निवडीसाठी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सहायक निबंधक अर्चना सैंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत निर्धारित वेळेत केवळ दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. सभापतिपदासाठी विनायक तांबे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून मावळते सभापती अरुण वाघ यांनी, तर उपसभापतिपदाचे सुधाकर शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून मावळते उपसभापती सोमनाथ भिसे यांनी स्वाक्षरी केली होती. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक-एकच अर्ज आल्याने सभापतिपदी तांबे यांची, तर उपसभापतिपदी शिंदे यांची बिनविरोध निवडीची घोषणा सहायक निबंधक अर्चना सैंदाणे यांनी केली.बैठकीस संचालक शांताराम कोकाटे, लक्ष्मण शेळके, विनायक घुमरे, जगन्नाथ खैरनार, सुनील केकाण, सुनील घुमरे, संजय खैरनार, सुनील चकोर, संगीता काटे, सविता उगले, पंढरीनाथ खैरनार, सुनीता बोºहाडे, लता रुपवते, दत्तात्रय सानप, रवींद्र पगार, सचिव विजय विखे, आर. एन. जाधव, सहायक निवडणूक अधिकारी संजय गायकवाड यांच्यासह संचालक उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, विठ्ठल उगले, नगरसेवक मल्लू पाबळे, सुहास गोजरे, रामभाऊ लोणारे, पंकज जाधव, दिगंबर देशमुख, कचरू डावखरे आदी उपस्थित होते.