शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सिन्नर : सभापतिपदी शिवेसेनेच्या शोभा बर्के बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 16:24 IST

सिन्नर : पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या नांदूरशिंगोटे गणाच्या सदस्य शोभा दीपक बर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सिन्नर : पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या नांदूरशिंगोटे गणाच्या सदस्य शोभा दीपक बर्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसभापतिपदी शिवसेनेचेच नायगाव गणाचे सदस्य संग्राम शिवाजीराव कातकाडे यांची निवड झाली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावास पहिल्यांदाच पंचायत समितीच्या सभापतिपदाचा मान मिळाला. पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी तहसीलदार राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभापतिपद इतर मागास प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव होते. शिवसेनेकडून सभापतिपदासाठी शोभा बर्के यांची उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून जगन्नाथ भाबड यांनी स्वाक्षरी केली होती. उपसभापतिपदासाठी शिवसेनेकडून गटनेते संग्राम कातकाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून माजी सभापती भगवान पथवे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली होती. राष्टÑवादी कॉँगेसचे आमदार माणिकराव कोकाटे समर्थक व तांत्रिकदृट्या भाजपात असलेल्या योगिता बाबासाहेब कांदळकर यांनीही सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावर सूचक म्हणून भाजपाचे गटनेते व आमदार कोकाटे समर्थक विजय गडाख यांनी स्वाक्षरी केली होती. तथापि, गडाख यांनी राज्यात महाविकास आघाडीचे शासन असल्याने व कोकाटे यांच्या आदेशाने आपल्या उमेदवारीची माघार घेऊन महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आपण शिवसेनेच्या उमेदवारास पाठींबा देत असल्याचे सांगितले. निर्धारित वेळेत योगिता कांदळकर यांनी माघार घेतल्याने सभापतिपदी शोभा बर्के यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापतिपदासाठी संग्राम कातकाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कोताडे यांनी केली. बैठकीस माजी उपसभापती संगिता पावसे, पंचायत समिती सदस्य सुमन बर्डे, वेणूबाई डावरे, रोहिणी कांगणे, रवींद्र पगार, तातू जगताप उपस्थित होते.नवनिर्वाचित सभापती सौ. शोभा बर्के यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शीतल सांगळे तर उपसभापती संग्राम कातकाडे यांचा जगन्नाथ भाबड यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, नगरसेवक पंकज मोरे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, नारायण वाजे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ तुपे, अरुण चव्हाणके, सुजाता तेलंग, अनिल सांगळे, ज्योती वामने, प्रतिभा नरोटे, विनायक शेळके, नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके, दीपक बर्के, संदीप भाबड, सोमनाथ वाघ, नीलेश कातकाडे, संजय शेळके, एकनाथ आव्हाड, रामदास चकणे उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळासाहेब आव्हाड तर शशिकांत येरेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक