शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

सिन्नर फाटा येथील आठवडे बाजाराला मिळू लागला पुन्हा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:15 IST

सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमितीच्या आवारात अडीच महिन्यांपूर्वी सुरू केलेला ‘शनिवारचा आठवडे बाजार’ विक्रेते व ग्राहकांमुळे बहरू लागला आहे. याठिकाणी दररोजचा भाजी व इतर बाजार सुरू केल्यास सिन्नर फाट्याच्या पूर्वीच्या बाजारपेठेसारखे पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी कृषी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.

मनोज मालपाणीनाशिकरोड : सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमितीच्या आवारात अडीच महिन्यांपूर्वी सुरू केलेला ‘शनिवारचा आठवडे बाजार’ विक्रेते व ग्राहकांमुळे बहरू लागला आहे. याठिकाणी दररोजचा भाजी व इतर बाजार सुरू केल्यास सिन्नर फाट्याच्या पूर्वीच्या बाजारपेठेसारखे पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी कृषी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.  सिन्नर फाटा येथील भाजीबाजार १९७० ते १९९० पर्यंत मोठी बाजारपेठ होती. त्या ठिकाणी कृषी बाजार उपसमितीदेखील कार्यरत होती. त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्य आदी सर्वप्रकारची बाजारपेठ म्हणून सिन्नरफाटा बाजारपेठेला मोठे महत्त्व होते. त्या ठिकाणी नाशिकरोड परिसर, गांधीनगर, जेलरोड व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी येत होते. तर शेतकरी, आडतदार, व्यापारी यांचीदेखील मोठी रेलचेल होती. १९९२ मध्ये मनपाने या ठिकाणी भाजीबाजारासाठी ओटेदेखील बांधून दिले. मात्र त्यानंतर विविध कारणांमुळे व नाशिकरोड परिसराचा झपाट्याने होत असलेला विकास आदी कारणांमुळे सिन्नर फाटा बाजारपेठेचे वैभव हळूहळू लयास गेले.  सिन्नर फाटा भाजीबाजारातील कृषी बाजार उपसमिती आवार एकलहरा रोडवरील स्वत:च्या जागेत स्थलांतरित झाले. मात्र त्याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष न दिल्याने सिन्नर फाटा उपबाजार आवार पाहिजे तसा फुलला नाही. त्यामुळे आजही नाशिकरोड पूर्व भागातील व त्यापुढील शेतकºयांना आपला शेतीमाल नाशिकच्या बाजार समिती आवारात घेऊन जावा लागत आहे. अडीच महिन्यांपूर्वी सिन्नर फाटा उपबाजार आवारात ‘शनिवारचा आठवडे बाजार’ सुरू करण्यात आला. प्रारंभी दोन्ही शनिवारी झालेल्या पावसामुळे आठवडे बाजार बसण्यास अडचण झाली होती. मात्र त्यानंतर भाजी व इतर विक्रेत्यांनी जिद्दीने शनिवारी सदर ठिकाणी दुकाने थाटण्यास सुरुवात केली. नाशिकरोड व आजूबाजूच्या भागातील रहिवाशांना जसजशी सिन्नर फाटा येथील शनिवारच्या आठवडे बाजाराची माहिती मिळू लागली तसतसा आठवडे बाजार बहरू लागला आहे. कृषी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी पंचक्रोशीतील शेतकरी, व्यापारी, विविध प्रकारचे विक्रेते यांच्याशी संपर्क साधून अजून प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच नाशिकरोड व आजूबाजूच्या भागातील रहिवाशांपर्यंत शनिवारच्या आठवडे बाजाराची माहिती पोहचविल्यास पूर्वीच्या सिन्नर फाट्याच्या भाजीबाजारपेठेचे लयास गेलेले वैभव पुन्हा प्राप्त करण्यास जास्त वेळ लागणार नाही. याकरिता कृषी बाजार समितीच्या पदाधिकाºयांचे प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहे. सुविधांची नितांत गरज सिन्नर फाटा उपबाजार आवारात स्वच्छता, जमीन सपाटीकरण, विद्युत व्यवस्था, पार्किंग, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय अशा गरजेच्या विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शनिवारच्या आठवडे बाजारात विविध विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करून व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच बहुतेक भाजीपाला विक्रेते दररोज व्यवसायासाठी बसण्यासाठी तयार आहेत. त्यादृष्टीने कृषी बाजार समितीने बैठक घेऊन नियोजन करणे, रहिवाशांना भाजी मार्केटची माहिती करून देणे गरजेचे आहे. यामुळे रोजगार, व्यवसायाची संधी प्राप्त होऊन इतर व्यवसायांनादेखील फायदा होईल. तर रहिवाशांना ताजा शेतीमाल कमी भावात मिळेल. शेतकºयांना नाशिकला जाण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील निर्धारित वेळेची शेतकºयांची वर्दळ कमी होईल. कृषी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी प्रामाणिकपणे लक्ष देऊन नियोजन केल्यास नक्कीच सिन्नर फाटा बाजारपेठेला पुनर्वैभव प्राप्त होईल.

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्या