शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर एमआयडीसीत वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:23 IST

सिन्नर : औद्योगिक वसाहतीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने कारखन्यांचे मोठे नुकसान होते. तर उद्योजकांनी आपला व्यवसाय कशा पध्दतीने करायचा, असा प्रश्न उद्योजकांसमोर पडला आहे.

सिन्नर : औद्योगिक वसाहतीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने कारखन्यांचे मोठे नुकसान होते. तर उद्योजकांनी आपला व्यवसाय कशा पध्दतीने करायचा, असा प्रश्न उद्योजकांसमोर पडला आहे. त्यामुळे सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीत सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी उद्योजकांनी वीज वितरण अधिकाऱ्यांकडे केली.माळेगाव औद्योगिक वसाहतीतल्या निमा कार्यालयात उद्योजक आणि वीज वितरण अधिकाºयांचे चर्चासत्र नुकतेच पार पडले. यावेळी कारखानदारांनी आपले गाºहाणे मांडले. यावेळी व्यासपिठावर अधीक्षक अभियंता पी. एम. दारूली, कार्यकारी अभियंता एम. बी. ठाकरे, निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष सुधीर बडगुजर, अतिरिक्त चिटणीस संदिप भदाणे, उर्जा उपसमितीचे अध्यक्ष रावसाहेब रकिबे, उर्जा उपसमितीचे अध्यक्ष बबन वाजे, पायाभूत उपसमितीचे अध्यक्ष किरण वाजे, महावितरणचे उपअभियंता एस. व्ही. पवार आदी उपस्थित होते. सिन्नर औद्योगिक परिसरात मोठया प्रमाणात स्टील, रोलींग मिल, प्लॅस्टीक मोल्डींग उद्योग, फुड इंडस्ट्रिज, फर्मासिटीकल आदी सातत्याने प्रक्रिया करणारे उद्योग मोठया प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसांपासून वसाहतीत होणाºया खंडीत वीज पुरवठयामुळे या उद्योगांचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. औद्योगिक क्षेत्रात सुरळीत वीज पुरवठा होणे आवश्यक आहे.महावितरणातर्फे पावसाळयाआधी मेंटनन्स काम केल्याचा दावा करण्यात येत असला तरी दिवसातून तीन ते चार वेळेस वीज पुरवठा खंडीत होत आहे. एकीकडे मेक ईन नाशिक व्दारे नाशिकमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणुकीसाठी प्रयत्न होत असतांना दुसरीकडे सततच्या खंडीत वीज पुरवठयामुळे कारखानदार त्रस्त होत आहेत. खंडीत व अपुºया वीज पुरवठयामुळे अनेक मल्टीनॅशनल कंपन्या बाहेरील राज्यात जाण्याच्या तयारीत आहेत. वसाहतीतील एक फिडर खंडीत झाला तरी याचा परिणाम वसाहतीतील २०० ते ३०० कंपन्यांना होत आहे. खराब डिस्ट्रिबुशन बॉंक्स, बॉक्समध्ये केलेली चुकीची वायरींग, झाडांमध्ये अडकलेल्या केबल्स व त्यामुळे होणारा खंडीत वीजपुरवठा तसेच वसाहतीतील उद्योजकांच्या अनेक समस्या रकिबे यांनी अधिकाºयांना सांगितल्या. सिन्नर औद्योगिक वसाहतीत होणाºया खंडीत वीज पुरवठयाची दखल घेत ४५ दिवसांच्या आत वसाहतीतील सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिक्षक अभियंता पी. एम. दारूली यांनी यावेळी दिले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता एम. बी. ठाकरे यांनी येत्या पंधरा दिवसांत प्राथमिक देखभालीचे काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. याचबरोबर वसाहतीत सर्वात जास्त वीज पुरवठा खंडीत होणाºया फिडर क्रमांक ३ चा मेंटनन्सचा प्रस्ताव मंजूर झाला असून त्यावर लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगीतले. नविन सब स्टेशनचा प्रस्ताव प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे यावेळी अधिकाºयांनी सांगीतले.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन