शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर : ‘रेझिंग डे’निमित्त विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्याला भेट पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली शस्त्रास्त्रांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:24 IST

सिन्नर : येथील पोलीस ठाण्यात रेझिंग डे निमित्त ब. ना. सारडा विद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावून पोलीस ठाण्यातील रचना, कार्यपध्दती, कामकाज, तक्रार निवारण करण्याची पध्दत याविषयी माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देकायदा सुव्यवस्थेबाबतीत माहितीउद्याचे भविष्य घडविणारे विद्यार्थी

सिन्नर : येथील पोलीस ठाण्यात रेझिंग डे निमित्त ब. ना. सारडा विद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलावून पोलीस ठाण्यातील रचना, कार्यपध्दती, कामकाज, तक्रार निवारण करण्याची पध्दत याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांचीही माहिती देण्यात आली.येथील ब. ना. सारडा विद्यालयातील विद्यार्थिनींना पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी आपल्या कायदा सुव्यवस्थेबाबतीत माहिती दिली. कुठलेही हत्यार बाळगणे हा गुन्हा आहे. यासाठी नियमाने कुठल्याही हत्यारासाठी परवानगी आवश्यक आहे. पोलीस ठाण्यात जी हत्यारे असतात त्यांचा परिस्थिती पाहूनच वापर करावा लागतो.प्रथम लाठीचार्ज , नंतर अश्रुधूर व त्यानंतर शेवटच्या क्षणी फायरींग करावी लागते. परंतु यासाठी पण वरिष्ठ अधिकाºयांची परवानगी घेणे आवश्यक असते. पोलीस व नागरीक आणि उद्याचे भविष्य घडविणारे विद्यार्थी यांना पोलीस ठाणे कसे काम करते तसेच पोलिसांचे व आपले संबंध अधिक मजबूत कसे होतील यासाठी आजचा दिवस असल्याचे देशमुख यांनी सांगितले. शस्त्र बाळगणे हा जरी गुन्हा असला तरी या शस्त्रांचा वापर देशासाठी फार महत्त्वाचा आहे. देशहितासाठी शस्त्र फार महत्त्वाचे असून, त्यासाठी सेना भक्कम आहे. पोलीस शिपाई सचिन गवळी, भगवान शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांची माहिती दिली.