शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला पोलीस-आरोग्य विभागाचा ‘अ‍ॅक्शन मोड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 20:38 IST

सिन्नर : वडांगळी येथील क्वॉरण्टाइन असलेले काही ग्रामस्थ सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने या आजाराचे गांभीर्य लक्षात आलेल्या ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेने ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये येत होम क्वॉरण्टाइन असलेल्या मात्र सार्वजनिक ठिकाणी फिरत असलेल्या व्यक्तींना कडक कारवाईचा इशारा दिला.

ठळक मुद्देवडांगळी । तपासणी करून होम क्वॉरण्टाइनना दिला कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : वडांगळी येथील क्वॉरण्टाइन असलेले काही ग्रामस्थ सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने या आजाराचे गांभीर्य लक्षात आलेल्या ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली. आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेने ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये येत होम क्वॉरण्टाइन असलेल्या मात्र सार्वजनिक ठिकाणी फिरत असलेल्या व्यक्तींना कडक कारवाईचा इशारा दिला.सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गर्दीला आळा घालण्यासाठी पोलीस कुमक वाढविण्यात आली. पोलिसांची वाढलेली संख्या पाहून अनेकांनी तत्काळ घराकडे पोबारा केला. दरम्यान, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनीही ग्रामविकास अधिकारी सोळंकी यांना वडांगळीतील गर्दी हटवून नागरिकांना घरात थांबविण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केल्या. बाजारपेठेत गर्दी होणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायतनेही बसस्थानक परिसरात दुकाने थाटणाऱ्या भाजी विक्रेत्यांना बाजारात दुकाने थाटायला लावली. त्यामुळे गर्दी नियंत्रणात आली. अत्यावश्यक सेवा देणारे किराणा, मेडिकल, शेतीविषयक औषधे व खतांची दुकाने, दवाखाने, बँक, बाजार आदी ठिकाणीही एक मीटरच्या अंतरावर ग्राहकांना उभे राहण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने चौकोन आखून दिले आहेत.आशा सेविकांचा असेल वॉचहोम क्वॉरटाइन असलेल्यांना काही लक्षणे आहेत का? त्याबाबत विचारणा करण्यात आली. वेगळ्या खोलीत राहण्याच्या सूचना दिल्या. ३५ जणांच्या भेटी घेण्यात आल्या. यापुढे आशा सेविकांना सर्व्हे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे होम क्वॉरण्टाइनवर यापुढे आशा सेविकांचा वॉच असेल, अशी माहिती देवपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल विधाते यांनी दिली. आरोग्य विभागाने दखल घेऊन होम क्वॉरण्टाइनचा सल्ला देण्यात आलेल्या नागरिकांची भेट घेतली. त्यांची यापूर्वीच आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. देवपूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल विधाते, डॉ. सायली गावडे यांच्यासह आरोग्यसेवक अशोक सानप, आरोग्यसेविका खालकर यांनी संबंधिताना आरोग्याबाबत काळजी घेण्याच्या सूचना केल्या.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या