शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:38 IST

सिन्नर : विनयभंगाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या २१ वर्षीय युवकाने येथील पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यानंतर नातेवाइकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती.सोन्या ऊर्फ डिचक दौलत जाधव (२१) रा. सिन्नर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. ...

सिन्नर : विनयभंगाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या २१ वर्षीय युवकाने येथील पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यानंतर नातेवाइकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती.सोन्या ऊर्फ डिचक दौलत जाधव (२१) रा. सिन्नर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी संशयित म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शनिवारी दुपारी ३ वाजून १९ मिनिटांनी त्यास अटक करण्यात आली. त्यानंतर सुमारे अर्धा तासातच त्याने कोठडीत असलेल्या खिडकीला कापडी फडक्याने (चिंधींने) गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी पत्रकारांना दिली.  घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी माधव पडिले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्यासह एसआरपीची तुकडी, एमआयडीसी व वावी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा सिन्नर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. पोलीस ठाण्यासमोर जोशीवाडीतील नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.  प्रांताधिकारी महेश पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस कोठडीत पंचनामा करण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आत्महत्त्याची नोंद करण्याचे काम सुरु होते. या घटनेचा तपास सीआयडीमार्फत केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.नातेवाइकांचा आरोपमयत सोन्या ऊर्फ डिचक जाधव यास खोट्या गुन्हांमध्ये अडकवण्यात आल्याचा आरोप यावेळी उपस्थितीत नातेवाइकांनी केला. यापूर्वीही त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यातून तो निर्दोष सुटला होता. मात्र त्यास वर्षभर तुरुंगात राहावे लागले होते असे नातेवाइकांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपूर्वीही तलवार बाळगल्याप्रकरणी त्याला गोवण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी यावेळी पत्रकारांसमोर केला.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेSuicideआत्महत्या