शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:44 IST

सिन्नर: शहरातील विजय नगर परिसरातील सोनवणे मळा वास्तव्यास असलेल्या 13 वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरात सिलींग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

ठळक मुद्देसायलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

सिन्नर: शहरातील विजय नगर परिसरातील सोनवणे मळा वास्तव्यास असलेल्या 13 वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरात सिलींग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.सायली पुरु षोत्तम जाधव (13) रा. सोनवणे मळा, विजय नगर, सिन्नर असे या मुलीचे नाव आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विजय नगरमधील सोनवणे मळा येथे पुरु षोत्तम जाधव हे कुटूंबियांसह वास्तव्यास असून ते शहरातील कापड दुकानात कामाला आहेत तर पत्नी माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात कामाला असून एक मुलगा व एक मुलगी असे चौकोनी कुटूंब असलेल्या जाधव यांच्या लग्नाच्या वाढिदवशीच अल्पवयीन मुलीने जीवनयात्रा संपविल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.मंगळवारी सकाळी सात वाजता सायलीची आई कंपनीत कामावर गेली तर वडील पुरु षोत्तम जाधव सकाळी साडेनऊ वाजता कापड दुकानात कामाला गेले. निघताना सायलीने विडलांना सायंकाळी लग्नाचा वाढिदवस असल्याने ‘आईस केक’ आणावयासही सांगितले होते. आईवडील दोघेही कामावर गेल्यानंतर सायली घरी एकटीच होती. तीने घरातील सर्व कामे आवरु न घेत घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने शेजारी वास्तव्यास असलेल्या मिहलेने नष्ट्यासाठी केलेला पदार्थ सायलीला देण्यासाठी जाधव यांच्या घराचा लोटलेला दरवाजा उघडला असता समोर पंख्याला लटकेल्या अवस्थेत सायली दिसल्यावर तीने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी सायलीचे वडील जाधव यांना भ्रमणध्वनीवरु न घटनेची माहिती दिली. अवघ्या अर्धातासापूर्र्वी अगदी उत्साहात कामाला आलेल्या विडलांना मुलीने आत्महत्या केल्याचे समजताच त्यांनी लागलीच घरी धाव घेतली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने सायलीला खाली उतरु न घेत उपचारार्थ शहरातील खासगी रु ग्णालयात घेऊन गेले. तथापि, उपचारांपुर्वीच तीची प्राणज्योत मालवली होती. घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. बी. रसेडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ यांनी घटनास्थळी जात मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरपालिका दवाखान्यात पाठविला. दरम्यान, सायलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत सिन्नर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास रामदास धुमाळ करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या